
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुण खेळाडूंसोबत संवाद साधला. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात त्यांनी देशातील खेळाडूंना सध्या स्थितीबाबत माहिती दिली. ऑलम्पिकमधील भारतीयांचे कमी प्रतिनिधित्व हे मोठे आवाहन असल्याचे मोदी म्हणाले. 2036 मधील ऑलम्पिकमध्ये सर्वच खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी सहभागी व्हावे यासाठी खास योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी देशभरात आता खेळाडूंसाठी टँलेंट हंटचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदी यांनी ही घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया डायलॉगमध्ये जो खेळेल तो बहरेल असा नारा दिला. गुरुवारी त्यांनी तरुण ॲथिलिटांना मार्गदर्शन केले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. आजच्या कार्यक्रमासाठी 1,500 हून अधिक शिक्षण संस्था या व्हर्च्युअली जोडल्या गेल्या होत्या. आयआयटी, आयआयएम, एम्स, चर्चित मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठातील खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित होते.
खेळाडूमुळे देशाची प्रतिष्ठा वाढते
जो खेले वो खिले, केवळ मैदानात जिंकणे नाही. तर व्यक्तिमत्वाचा विकास, कुटुंबाचा विकास, देशाचे नाव जगात वाढवणे आहे. खेळाडूच्या यशामुळे त्याच्या कुटुंबाची, देशाची, शाळा-महाविद्यालयाची, जिल्हा, राज्याची ओळख मजबूत होते. त्या खेळाडूमुळे जग त्याचे शहर आणि राज्याला ओळखते. खेळाडूमुळे कुटुंबाची, देशाची, राज्याची, त्या शहराची प्रतिष्ठा वाढते, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले.
ऑलम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व वाढीवर जोर
ऑलम्पिकबाबत त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. अनेक खेळांमध्ये भारताची एंट्रीच होत नाही. 2012 मध्ये भारताने केवळ 13 खेळामध्ये सहभागी झाले होते. त्यातील अनेक खेळांची नावं आपल्याला माहिती नसतात. ऑलिंपिकमधील अर्ध्याहून अधिक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व नाही. आपल्याला मेडल वाढवण्यासाठी या खेळांमध्ये आपलं सहभागित्व वाढवावे लागेल. हे मोठे आवाहन आहे. त्यासाठी आपल्याला टॅलेंट हंटची आपण लालकिल्ल्यावरून घोषणा केली होती. सरकारकडून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल. ती मदत करेल. भारत सरकार स्पोर्ट इकोसिस्टिम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. आधुनिक स्पोर्ट्स विद्यापीठापासून ते प्रशिक्षण संस्थांपर्यंत उभारण्याचे काम सुरू आहे. 2036 साठी आपल्याला खेळाडू तयार करायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Khelo India has become a wonderful platform for nurturing sporting talent across the country. It is providing young athletes with opportunities and support to pursue their dreams.@kheloindia
https://t.co/hj8qEJRj09— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2026
खेळाडूंसाठी टॅलेंट हंटची घोषणा
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातून खेळाडू निवडीसाठी टॅलेंट हंट राबविण्याची घोषणा केली. समाजाचा खेळाविषयीचा समज आण दृष्टिकोन बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या खेळाडूने नशेपासून दूर राहावे असा सल्ला त्यांनी दिला. मला भारतीय तरुणांवर पूर्ण विश्वास आहे. कोणता मुलगा हा कोणत्या खेळासाठी फीट आहे हे ओळखा. त्याचे टॅलेंट ओळखा. स्पोर्टस इकोसिस्टिम वाढीसाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारकडून तरुण खेलाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Leave a Reply