
अमेरिकेत १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वापरासाठी नवे आणि कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. मेटा कंपनीने अमेरिकेतील विविध राज्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या करारानंतर हा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार, १८ वर्षांखालील वापरकर्त्यांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता येणार नाही. याशिवाय, किशोरवयीन मुलांना दिवसातून केवळ दोन तास हे प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी असेल. शालेय दिवसांमध्येही त्यांच्या सोशल मीडिया वापराला निर्बंध घालण्यात आले आहेत.
अमेरिकेतील २९ हून अधिक राज्यांनी मेटावर गंभीर आरोप केले होते की, मेटाचे प्लॅटफॉर्म किशोरवयीन मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लावत आहेत. या तक्रारीनंतर जवळपास १६.६८ बिलियन डॉलरच्या खटल्याचा समझोता झाला, ज्यामुळे मेटाने ही नियमावली स्वीकारली आहे. १८ वर्षांखालील युझर्झना सुरक्षित अनुभव मिळावा आणि त्यांना कंटेंटचे व्यसन लागू नये यासाठी मेटा त्यांच्या अल्गोरिदममध्ये बदल करणार आहे.
Leave a Reply