• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?

August 27, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आता सुरु आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघ जिंकेल अशी चिन्हे दिसत आहे. आता हा दुसरा कसोटी सामनाही जर भारतीय संघाने जिंकला तर भारतीय संघाला मालिका जिंकण्यात यश मिळेल. आता भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला एक सल्ला मिळाला आहे.

शुभमन गिलच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया श्रीलंकेत २-० ने मालिका जिंकण्याच्या जवळ पोहोचली आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांची शुभमन गिलबद्दल एक तक्रार आहे. त्यांच्या मते, कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलची क्षेत्ररक्षणाची जागा योग्य नाही, ज्यामुळे संघाच्या प्रगतीला अडथळा येत आहे. कैफ यांच्या मते, शुभमन गिलने कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करू नये. त्याने आपली जागा बदलून स्लिप्समध्ये उभे राहावे.

सोनी स्पोर्ट्सवर भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे समालोचन करताना मोहम्मद कैफ म्हणाले की, गिलने स्लिप्समध्ये उभे राहिले पाहिजे, जिथे तो खेळावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकतो. माझी इच्छा आहे की शुभमन गिलने स्लिप्समधून कर्णधारपद भूषवावे. तो मिड-ऑफमधून कर्णधारपद भूषवतो. तुम्ही लोकांना डीआरएसबद्दल विचारा. जेव्हा विराट कोहली कर्णधार झाला, तेव्हा तो स्लिप्समध्ये उभा राहू लागला. स्लिप्समधून खेळावर नियंत्रण ठेवता येते. म्हणूनच रोहित आणि विराट स्लिपमध्ये उभे राहायचे. कोणीही जन्मतःच स्लिपचा क्षेत्ररक्षक नसतो.”

या मालिकेत शुभमन गिलच्या कर्णधारपदाचेही कौतुक होत आहे. हे कौतुक त्याच्या गोलंदाजीतील रोटेशनमुळे होत आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी या मालिकेत मानव सुतार आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा वापर केल्याबद्दल गिलचे कौतुक केले आहे. गिल एक नवीन कर्णधार आहे. जसजसा त्याला अनुभव मिळेल, तसतसे त्याचे कर्णधारपद अधिक सुधारेल. आता भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. जर भारतीय संघाने हा सामना जरी गमावला तरीही मालिकेत बरोबरी साधतील.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता…
  • Nepal Flood: 4000 फूट खाली कोसळला 2 हजार फूट रुंद बर्फाचा डोंगर; नेपाळच्या महाप्रलयाची Inside Story
  • Nepal Flood: अख्खं मार्केट वाहून गेलं, फक्त प्रेतं वाहून येत होती… नुसता मृतदेहांचा खच, प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं त्याने सर्वच हादरले
  • सेहवाग-द्रविडची मुलं आता थेट भारतीय संघात, वनडे टीममध्ये मिळाली जागा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज
  • धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in