• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही….

July 9, 2026 by admin Leave a Comment


मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या धक्क्यांमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. हा भूकंप रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला असून, बसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवल्याची नोंद झाली आहे. याशिवाय परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या वित्तहानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, संबंधित प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in