
महिला आशिया कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना काल पार पडला. श्री चरणी, प्रेमा रावत, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या फिरकी गोलंदाजांच्या चौकडीने पाकिस्तानला महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी ५५ धावांवर गुंडाळले. त्यानंतर भारताने अवघ्या ८.४ षटकांतच हे लक्ष्य पूर्ण केले.
कर्णधार हरमनप्रीत कौर या गोष्टीने खूप खूश आहे की, भारतीय संघाने अतिशय उतकृष्ट कामगिरी केली. या सामन्यानंतक कर्णधार कौर म्हणाली की, “हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना होता. आम्ही आक्रमक दृष्टिकोन ठेवून खेळलो, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. सर्व गोलंदाज उत्कृष्ट होते. त्यांनी आपल्या योजनांची अंमलबजावणी केली.”
खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतला आणि त्यानुसार गोलंदाजी केली. आपला दर्जा उच्च ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हा संघ काय करू शकतो हे मला माहीत आहे. तीन गडी गमावण्याबद्दल बोलायचे झाल्यास, असे होऊ शकते.” पाकिस्तानकडे एक चांगला गोलंदाजीचा मारा आहे.
हरमनप्रीतने कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध आपला १५० वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि पुरुष व महिला क्रिकेट या दोन्हीमध्ये हा टप्पा गाठणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली. ती म्हणाली, “मी आभारी आहे. मी इतक्या पुढे पोहोचेन असे मला कधीच वाटले नव्हते. मला असाच पाठिंबा देत राहा. मला आशा आहे की मी हे चांगले काम पुढेही चालू ठेवू शकेन.
भारतीय महिला संघाने आतापर्यंत २२८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी २०५ सामन्यांमध्ये हरमनप्रीतचा सहभाग राहिला आहे.




Leave a Reply