• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंना टिळा आवश्यक, विश्व हिंदू परिषदेची नियमावली..

September 6, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रातील नवरात्री उत्सवात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याचा मोठा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेने महाराष्ट्रात नवरात्रीदरम्यान होणाऱ्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर उपस्थितांवरही कठोर नियम प्रस्तावित केले आहेत. नवरात्री दरम्यान आयोजकांनी काय करावे आणि करू नये, याचीही यादी व्हिएचपीने दिली आहे. नवरात्री उत्सवादरम्यान गरबा-दांडिया सारख्या कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा नाही, असे ठरवले आहे. हिंदूंची ओळख पडताळण्यासाठी उपस्थितांची आधार तपासणी आणि कपाळावर टिळा लावण्याचे आवाहनही व्हिएचपीने केले आहे. आम्ही कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाही, नवरात्रीचा उत्सव हा फक्त नाच-गाण्यापुरता मर्यादित नाही.

हा सण देवीच्या उपासनेचा आहे. मूर्तीपूजेच्या विरोधात असलेल्या मुस्लिमांनी या सणात का सहभागी व्हावे?” मुस्लिमांना नवरात्रीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू न देण्याचा निर्णय घेतला असला तरी विश्व हिंदू परिषद कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाही. धर्मांतर आणि गोहत्या विरोधातील मूळ उद्दिष्टांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही व्हिएचपीने जाहीर केले.

सण हे हिंदूंच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. त्याचे मूल्य किंवा महत्त्व आम्ही अजिबात कमी होऊ देणार नाही. हे निर्बंध खबरदारीचे उपाय म्हणून अवलंबत असून त्यातून मुस्लीम किंवा इतर कोणत्याही समुदायाला आमचा विरोध नाही. आठवड्याभरापूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत असताना म्हटले की, भारतात एकही मुस्लीम नको, असे जर एखाद्या हिंदूला वाटत असले तर तो हिंदू नाही.

जर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेत असाल तर तुम्हाला मान्य करावे लागेल की सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे नेतात. प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा असून माणसांमध्ये कोणताही भेद नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाबाबत व्हिएचपीच्या नायर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही संघाच्या सरसंघचालकांच्या विधानावर भाष्य करणार नाही. आम्ही कोणाच्याही विरोधात नसून आमचाही सामाजिक सलोखा आणि शांततेवर विश्वास आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raj Thackeray: रावणाला 1 लाख मुल आणि दीड लाख नातू, रावणमध्ये जेवला की नाही? राज ठाकरेंचा मिश्किल सवाल
  • Poonam Pandey: वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; पुनम पांडेच्या मागणीने मोठी खळबळ
  • मला भीती वाटते की… राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या…
  • Raj Thackeray On GDP : नरेंद्र मोदींच्या GDP च्या दाव्यावर राज ठाकरे यांनी विचारला एकदम परफेक्ट निरुत्तर करणारा प्रश्न
  • तो कोण कुरळ्या केसांचा बाबा… राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in