• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hardik Pandya : बस्स आता अजून नाही, फक्त खराब रिझल्टच नाही, तर ड्रेसिंग रुममध्ये..हार्दिक पंड्याचं दु:ख, हरलेल्या राजाची गोष्ट

May 30, 2026 by admin Leave a Comment

हार्दिकला पूर्ण तीन सीजन संधी दिली. पण त्याला छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. तिन्ही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत घसरणच दिसून आली.

 मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा सीजन खूपच खराब ठरला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीमने खूप खराब प्रदर्शन केलं. हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सच नातं जवळपास तुटल्यात जमा आहे.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा सीजन खूपच खराब ठरला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीमने खूप खराब प्रदर्शन केलं. हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सच नातं जवळपास तुटल्यात जमा आहे.

रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2026 मधील खराब प्रदर्शनानंतर हार्दिक मानसिक दृष्टया थकला आहे. त्याने फ्रेंचायजी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज तकने हे वृत्त दिलय.

रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2026 मधील खराब प्रदर्शनानंतर हार्दिक मानसिक दृष्टया थकला आहे. त्याने फ्रेंचायजी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज तकने हे वृत्त दिलय.

हार्दिक पंड्या आता 32 वर्षांचा आहे. टुर्नामेंट सुरु असताना मध्यावर त्याने मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला आपल्या निर्णयाची माहिती दिली. सततच खराब प्रदर्शन टीमवर वाढता दबाव आणि सततच्या टीकेमुळे हार्दिक आतमधून पूर्णपणे कोसळून गेलाय. PTI वृत्तसंस्थेने ही बातमी दिलीय.

हार्दिक पंड्या आता 32 वर्षांचा आहे. टुर्नामेंट सुरु असताना मध्यावर त्याने मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला आपल्या निर्णयाची माहिती दिली. सततच खराब प्रदर्शन, टीमवर वाढता दबाव आणि सततच्या टीकेमुळे हार्दिक आतमधून पूर्णपणे कोसळून गेलाय. PTI वृत्तसंस्थेने ही बातमी दिलीय.

हार्दिकने आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व संभाळलं. त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये टीमला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आयपीएलचा यंदाचा सीजन टीमसाठी खूपच खराब ठरला. टीम प्लेऑफच्या शर्यतीतून खूप आधीच बाहेर गेली.

 मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमधल्या आशा जेव्हा संपुष्टात आल्या तेव्हा हार्दिक आणि फ्रेंचायजीमध्ये परस्पर सहमतीने वेगळं होण्याबद्दल चर्चा सुरु झाली. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही बाजू आता परस्परसहमतीने वेगळ्या होणार आहेत.

मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमधल्या आशा जेव्हा संपुष्टात आल्या, तेव्हा हार्दिक आणि फ्रेंचायजीमध्ये परस्पर सहमतीने वेगळं होण्याबद्दल चर्चा सुरु झाली. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही बाजू आता परस्परसहमतीने वेगळ्या होणार आहेत.

हार्दिक फक्त टीमच्या खराब परफॉर्मन्समुळे त्रस्त नव्हता तर सततचा मानसिक दबाव आणि ड्रेसिंग रुममधल्या वातावरणामुळे सुद्धा तो आतमधून कोलमडलाय असं सूत्रांनी सांगितलं. त्यात त्याला पाठिचं दुखणं त्रास देत होतं.

हार्दिक फक्त टीमच्या खराब परफॉर्मन्समुळे त्रस्त नव्हता, तर सततचा मानसिक दबाव आणि ड्रेसिंग रुममधल्या वातावरणामुळे सुद्धा तो आतमधून कोलमडलाय असं सूत्रांनी सांगितलं. त्यात त्याला पाठिचं दुखणं त्रास देत होतं.

हार्दिक मानसिक दृष्टया पूर्णपणे थकला आहे. प्लेऑफच्या आशा संपु्ष्टात येताच त्याने पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही हे स्पष्ट केलं असं आयपीएलमधल्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं.

हार्दिक मानसिक दृष्टया पूर्णपणे थकला आहे. प्लेऑफच्या आशा संपु्ष्टात येताच त्याने पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही हे स्पष्ट केलं, असं आयपीएलमधल्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं.

रोहित शर्माच्या जागी हार्दिकने मुंबई इंडियन्सच नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्याला फॅन्सच्या नाराजीचा सामना करावा लागला. मागच्या दोन सीजनमध्ये त्याला अनेक स्टेडियममध्ये हूटिंग सहन करावी लागली. बाहेरुन तो मजबूत दिसायचा. पण आतून त्याला या सगळ्याचा त्रास होत होता.

2021 साली हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच ड्रेसिंग रुम सोडताना जे वातावरण होतं 2024 ला तो परतून आला तेव्हा हार्दिकला तसा ड्रेसिंग रुम मिळाला नाही. टीम मधल्या अनेक सिनियर खेळाडूंमध्ये एकमत नव्हतं. टीममध्ये प्रत्येकजण वेगळा विचार करु लागतो तेव्हा कॅप्टनला सर्वकाही संभाळणं कठीण होऊन बसतं.

2021 साली हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच ड्रेसिंग रुम सोडताना जे वातावरण होतं, 2024 ला तो परतून आला, तेव्हा हार्दिकला तसा ड्रेसिंग रुम मिळाला नाही. टीम मधल्या अनेक सिनियर खेळाडूंमध्ये एकमत नव्हतं. टीममध्ये प्रत्येकजण वेगळा विचार करु लागतो, तेव्हा कॅप्टनला सर्वकाही संभाळणं कठीण होऊन बसतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले; 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार ‘हा’ नवा नियम, पाहा काय होईल फायदा
  • केस केराटिनसारखे होतील मऊ, फक्त ‘हे’ 4 नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर
  • Vijay -Trisha : ना बर्थडे विश, ना काही पोस्ट.. थलपती विजय यांना त्रिशाने केलं अनफॉलो ? त्या कृतीमुळे खळबळ
  • Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?
  • मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in