• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GST विभागाच्या महिला उपायुक्त 50000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडल्या, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

July 16, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशात प्रशासनातील एका बड्या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. जीएसटी विभागाच्या महिला उपायुक्त अंबिका यांना 50000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. अधिकाऱ्याने व्यावसियाकाला परतावा आणि जीएसटी मूल्यांकन मंजूर करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. त्यानंतर लाच घेताना साध्या वेशातील महिला पोलिसांनी उपायुक्त अंबिका यांना अटक केली.

उत्तर प्रदेशच्या भेलूपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लखरांव बजरडीहा भागातील अजय कुमार मौर्य हे ब्लॅक स्मिथ इंडस्ट्रीचे संचालक आहेत. त्यांनी उपायुक्तांची पोलिसांकडे तक्रार केली होती. उपायुक्त अंबिका यांनी कंपनीच्या फेब्रुवारी 2023 च्या रिटर्न आणि जीएसटी मूल्यांकनासाठी लाच मागितली होती. महिला अधिकाऱ्याने लाच मागितल्याने व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

 

GST Deputy Commissioner Ambika Singh was caught red-handed accepting a ₹50,000 bribe in Varanasi, Uttar Pradesh, for processing a trader’s file and approving a tax refund. pic.twitter.com/ge5gyHXeHB

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 16, 2026

…अन् लाच घेताना अधिकारी रंगेहाथ सापडल्या 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार पोहोचल्यानंतर विभागाच्या पथकाने महिला अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला ठरलेल्या पैशांसहित एका रेस्टॉरंटजवळ पाठवलं. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने रस्त्यावर 5० हजारांची लाच घेतली, त्यानंतर तातडीने पथकाने त्यांना घेरलं.पथकात साध्या वेशात महिला पोलीस होत्या. महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अंबिका या तातडीने पळ काढण्याचा प्रयत्न करू लागल्या. परंतु महिला पोलिसांच्या तावडीतून  सुटू शकल्या नाहीत. महिला पोलिसांनी त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात केली. जीएसटी विभागाच्या उपायुक्तांना लाच घेताना अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपायुक्तांच्या विरोधात कारवाईला सुरुवात 

लाचलुचप विभागाच्या पथकाने कारवाईनंतर त्यांच्या विरोधात वाराणसी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाचखोरी प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. घटनसास्थळी गोळ्या केलेल्या सर्व पुरावांच्या आधारे आरोपी महिला अधिकाऱ्यांवर कारवा करण्यात येत आहे. परंतु चक्क जीएसटी उपाआयुक्त महिला अधिकारी लाच घेताना सापडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उपायुक्तांवर कारवाई केली जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in