
शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेली ते म्हणाले की, जरांगे पाटील यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि 11 वाजता आपला नियोजीत कार्यक्रम आहे. जवळजवळ 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती. मला सकाळी 11 वाजताच फोन आलाय की कार्यक्रम रद्द करा. मी दादाला विनंती केली की दादा तुम्ही मला रात्री जरी बोलले असते तरीही मी कार्यक्रम रद्द केला असता. आता लोक येऊन बसले आहेत आणि आता मी कार्यक्रम रद्द करावा असं माझ्या मनाला सयुक्तिक वाटत नाही. ज्या तुमच्या भावना आहेत त्या माझ्याही आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply