• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda : देवाने ठरवलंय तर…, अप्रत्यक्ष टिप्पणी करत गोविंदाने साधला बायको सुनीतावर निशाणा!

September 6, 2026 by admin Leave a Comment


Govinda : अभिनेता गोविंदा याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत गोविंदा याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता गोविंदा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याची बायको सुनीता आहुजा हिने गोविंदा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. गोविंदा याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप सुनीता हिने केले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा याच्या खासगी आयुष्याची आणि सुनीता हिच्या आरोपांची चर्चा सुरु आहे. यावर आता गोविंदा याने अप्रत्यक्ष टिप्पणी करत सुनीता हिच्यावर निशाणा साधला आहे.

सांगायचं झालं तर, गोविंदा जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेला. जेथे त्याने भन्नाट डान्स देखील केला. यावेळी गोविंदा याने आगामी सिनेमाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. शिवाय अभिनेत्याने सुनीता हिच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘अनेक गोष्टी आहेत, ज्या देवाने आधीच ठरवलेल्या आहेत. मी फक्त एकच प्रर्थना करतो की, सर्वकाही साफ होईल आणि गोविंदा सर्वकाही ठिक करेल… गेल्या अनेक वर्षांपासून मला पाठिंबा देण्यासाठी आभारी आहे.. मी नव्या सिनेमातून आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे… यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे… मी प्रार्थना करतो की, सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम भेटावं…’, असं देखील अभिनेता म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by TNM Cinema and Beyond (@tnmentertainment_)

सांगायचं झालं तर, गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यांमध्ये वाद सुरु असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.  सुनीता हिने अनेकदा गोविंदा यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोप चर्चेत असताना गोविंदा याला अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे  चर्चांनी अधिक जोर धरला..

कोमल हिच्यासोबत व्हिडीओ समोर आल्यानंतर ‘लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, त्याला लाज वाटते की नाही…’, असं सुनीता सर्वांसमोर म्हणालेली. त्यानंतर गोविंदा याने देखील सडेतोड उत्तर दिलेलं, ‘सुनीता हिने तिच्या मर्यादा विसरायला नकोत… पुढे कधीतरी तिला माझी गरज लागेलच…’, असं देखील गोविंदा म्हणालेला.. सांगायचं झालं तर,  सुनीताने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंना टिळा आवश्यक, विश्व हिंदू परिषदेची नियमावली..
  • भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला…
  • Prajakta Mali: घरच्यांना समजावणं अवघड.., लग्नाच्या दबावावर अखेर प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली
  • Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचललं मोठं पाऊल, पुन्हा मॅच फिक्सिंगची चर्चा, खेळाडूंकडून काढून घेतले…
  • Sanjay Raut: तुम्ही पिशवी घेऊन या, आपण बाजारात जाऊ, महागाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना घेरलं, म्हणाले काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in