
देशातलाच काय तर आशियातील पहिला प्रवासी ट्रेन मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे अशी १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली होती. मुंबई ते ठाणे अशी ट्रेन पहिल्या दिवशी धावली त्या क्षणाची क्षणचित्रे प्रबोधनकार ठाकरे यांनी एका पुस्तकात लिहिली आहेत.
मुंबईचे बोरीबंदर स्थानक हे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून थोडे दूर अंतरावर होते. १८५३ साली कोळशाच्या तीन इंजिनांच्या सहाय्याने १४ डब्यांची ही ट्रेन ठाण्याला निघाली तेव्हा भायखळा येथे हॉल्ट घेतला होता.
करीरोड स्थानकाचा इतिहास वेगळा आहे. मुळात हे स्थानक येथील भायखळा येथील रेसकोर्सच्या घोड्यांची पुण्याला वाहतूक करण्याच्या उद्देश्याने बांधले होते.
मुंबई आणि बडोदरा दरम्यान रेल्वेचे काम करण्यासाठी बॉम्बे, बडोदा अॅड सेन्ट्रल इंडिया रेल्वेची स्थापना झाली होती. त्याचे प्रतिनिधी असलेले ब्रिटीश अधिकारी सी. करी यांच्या नावाने करी रोड स्थानकाची स्थापना करण्यात आली.
भायखळा – महालक्ष्मी रेसकोर्सवरून घोड्यांना पुण्याच्या रेसकोर्सबर नेण्यासाठी करी रोड स्थानकाचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात करण्यात आले.




Leave a Reply