• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?

July 3, 2026 by admin Leave a Comment


भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनुसार त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याने दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळणार नाही, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. (PC-GETTY IMAGES)

Arshdeep Singh and Vaibhav Sooryavanshi

वैभव पदार्पणाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्याला संधी कशी द्यायची हा प्रश्न आहे. तसेच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे या दोघांना कसं बाहेर करायचं? असा प्रश्नही मोर्कलने उपस्थित केला. तसेच आम्ही खेळाडूंना पूर्ण संधी देणार, असंही मोर्कलने स्पष्ट केलं. (PC-GETTY IMAGES)

Team India Vaibhav Sooryavanshi

मॉर्ने मोर्कलआधी टीम इंडियाच्या बॅटिंग कोचनेही हा मुद्दा उपस्थित केला. इतकंच काय तर कर्णधार श्रेयस अय्यर यानेही वैभवला संधी न मिळण्यामागील कारण सांगितलं. त्यामुळे वैभवला संधी तरी केव्हा मिळणार? असा प्रश्न यानिमित्ताने जोर धरु लागला आहे. (PC-GETTY IMAGES)

Vaibhav Sooryavanshi England Tour

वैभवच्या पदार्पणाची प्रतिक्षा केवळ भारतीयांनाच नाही तर दिग्गज खेळाडूंनाही आहे. तसेच अनेक माजी खेळाडूंकडूनही वैभवला संधी का दिली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतकंच नाही तर दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांनीही वैभवला पदार्पणाची संधी देण्याबाबत भाष्य केलंय. (PC-GETTY IMAGES)

Vaibhav Sooryavanshi Cricket Career

वैभवला दुसऱ्या सामन्याआधी फलंदाजीचा सराव करण्याचीही संधी मिळाली नाही. मात्र वैभवने सहकाऱ्यांसह बॉलिंगचा सराव केला. आता वैभवचं पदार्पण केव्हा होतं? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. (PC-GETTY IMAGES)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in