
महायुतीच्या समन्वय बैठकीत आगामी जिल्हा परिषद, विधान परिषद, सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे १७० महामंडळांवरील ६५० हून अधिक सदस्यांच्या नियुक्त्या महिनाभरात पूर्ण करण्याचे ठरले. विकासकामांसाठी निधीच्या समन्वयासह महायुतीतील घटकपक्षांमध्ये अधिक ताळमेळ वाढवण्यावरही भर देण्यात आला.
महाराष्ट्रातील महायुतीच्या सहा मंत्र्यांच्या समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी काळातील राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीतील चर्चेची माहिती दिली.
Leave a Reply