• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, जाणून घ्या

July 3, 2026 by admin Leave a Comment


फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 32 फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात अतितटीचा सामना झाला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाला 2-1 ने पराभूत करून उप उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच 16 संघांच्या फेरीत प्रवेश केला. (Photo: Getty Image)

पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील एक ऐतिहासिक गोल करून आपली प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आणि पोर्तुगालच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी हा गोल खास होता. (Photo: Portugal Football Twitter)

पहिल्या हाफ गोलरहित राहल्यानंतर क्रोएशियाने दुसऱ्या हाफमध्ये हल्ले अधिक तीव्र केले. 53 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या अनुभवी इव्हान पेरिसिचने गोल मारला. त्यानंतर 68 व्या मिनिटाला व्लासिचने फाऊल केल्याने पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने या सुवर्णसंधीचे गोलमध्ये रूपांतर करून पोर्तुगालला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. (Photo: Portugal Football Twitter)

ख्रिस्तियानो रोनाल्डो 2006 मध्ये आपला पहिला विश्वचषक खेळला होता आणि यावेळी सहाव्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे. आपला पहिला बाद फेरीतील गोल करण्यासाठी त्याला 20 वर्षे वाट पाहावी लागली. म्हणजेच यापूर्वी त्याला बाद फेरीत एकही गोल मारता आला नव्हता. (Photo: Portugal Football Twitter)

सामन्याच्या 81 व्या मिनिटाला पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोला बदली खेळाडू म्हणून बाहेर पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. अतिरिक्त वेळेत ही रणनीती यशस्वी ठरली. 94व्या मिनिटाला, दली खेळाडू गोन्कालो रामोसने हवेत उंच उडी मारून एक अप्रतिम हेडर मारून पोर्तुगालला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. (Photo: Portugal Football Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या वाट्याला थेट अर्थमंत्रिपद? गडकरी-फडणवीस नव्हे, या नेत्याचे नाव आघाडीवर
  • स्वर्गापेक्षा सुंदर, रायगड जिल्ह्यातील धपकी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी
  • Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?
  • IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि…
  • FIFA World Cup: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in