
देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेतंर्गत (EPFO) ईपीएफओ सदस्यांना पीएफ, पेन्शन आणि मोफत विम्याचा लाभ मिळतो. पण जर कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला तर कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसतो. अशा कठीण परिस्थिती EPFO कुटुंबाला पीएफ रक्कमेशिवाय इतरही लाभ देते. EPF सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला, कायदेशीर वारसाला प्रोव्हिडंट फंडातील बचत, पेन्शन पेमेंट आणि विम्याचा लाभ देण्यात येतो. काय आहे याविषयीची प्रक्रिया?
कायदेशीर वारसाला लाभ
EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील कायदेशीर वारसाला पीएफ, विमा लाभ आणि पेन्शनचा लाभ देण्यात येतो. मयताचे लग्न झाले नसले तर ही रक्कम त्याच्या आई-वडीलांना देण्यात येते. ईपीएफओच्या नियमानुसार, सदस्य एकटा असेल तर तो त्याच्या पसंतीनुसार कायदेशीर वारस जोडू शकतो. सदस्याचे कुटुंब असेल, तर पत्नी ही कायदेशीर वारस ठरते. जर पत्नी नसेल तर मोठ्या मुलाला कायदेशीर वारस केल्या जाऊ शकते.
क्लेम करण्यासाठी कोणती कागदपत्रं महत्त्वाची?
मयत EPF कर्मचाऱ्याचा 12 अंकांचा UAN क्रमांक
लाभार्थ्यांचे आधार कार्ड, नाव आणि जन्म तारीख
सदस्याचे मृत्यू प्रमाणपत्र, 2 एमबी पीडीएफमध्ये
लाभार्थ्याचे बँक खाता पुरावा, एक कॅन्सल धनादेश, पासबुकचे छायाचित्र
कोणता फॉर्म भरावा लागणार?
क्लेम करणाऱ्यांनी प्रोव्हिडेंट फंड, पेन्शन आणि इन्शुरन्स यासाठी वेगवेगळे अर्ज, फॉर्म भरावे लागतील.
सदस्याला PF चा पैसा एकरक्कमी मिळावा यासाठी फॉर्म क्रमांक 20, पेंशन दाव्यासाठी फॉर्म 10D
तर EDLI लाईफ इन्शुरन्सच्या फायद्यासाठी फॉर्म 5IF। भरावा लागेल
दावा प्रलंबित राहू नये यासाठी करा हे काम
क्लेम दाखल करण्यापूर्वी मयत सदस्याचे नाव, UAN, PF रेकॉर्ड, वारसदाराचे नाव आणि त्याच्या बँकेची माहिती नोंदवावी. मृत्यू प्रमाणपत्र आणि पेन्शनचा दावा करण्यासाठी कायदेशीर वारसाचा पुरावा, मुलांचा जन्म दाखला तयार ठेवावा. जर प्रमाणपत्रावरील माहिती आणि नोंदवलेल्या माहिती थोडीबहुत तफावत असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. बँक खात्याची चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रं देऊ नका, नाहीतर प्रक्रियेला उशीर होऊ शकतो.
Leave a Reply