नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना तख्त श्री हजूर साहेब गुरुद्वारा येथून बाहेर येत असताना घडली. निहाल जसपाल सिंग नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
Latest News
अगामी सुनावणी मंगळवारी, पण… कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटी आणि आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, ज्यात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला नाही, तसेच निवडणूक आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्थेचा विचार केला नाही, असे सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडले. सुनावणीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत […]
यशस्वी जयस्वाल आणि गिलची कमकुवत बाजू श्रीलंकेच्या केंद्रस्थानी, या चार गोलंदाजांना वापरणार
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या बऱ्याच उणीवा समोर आल्या आहेत. त्यामुळे कसोटी मालिका भारतासाठी कठीण पेपर असणार आहे. गेल्या काही वर्षात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना संघर्ष करत आहेत. त्यामुळे श्रीलंकेत फिरकीचा सामना करणं भारतीय फलंदाजांसाठी आव्हान असणार आहे. असं असताना या स्थितीत कर्णधार शुबमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर विश्वास टाकला जात […]
महिलांना आधी 20000 नंतर 30000 रुपये, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, योगी सरकार…
फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी खास योजना आखण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील महिलांना तीन टप्प्यांत एकूण 50 हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती […]
Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, सरकारने पेटारा उघडला, खात्यावर 1500 पडणार!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील हजारो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र राज्यातील महिलांना अद्याप जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. आता या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने पैशांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच […]
देशात इलेक्ट्रिक गाड्यांची तुफान विक्री; देशभरात 67 हजारांहून अधिक ईव्ही चार्जिंग स्टेशनचे जाळे सज्ज
बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे देशात ईव्ही क्रांती पाहायला मिळत आहे. सार्वजनिक आणि खाजगी भागीदार्यांमधून देशभरात उभारण्यात आलेल्या 67 हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन्समुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास अत्यंत सोपा आणि सुकर झाला आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि सरकारी पाठबळामुळे इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींच्या विक्रीत सातत्याने विक्रमी नोंद होत आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) ट्रेंड खूप […]