• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचा मास्टरमाईंट पी. व्ही. कुलकर्णीला मोठ झटका, बीडमध्ये आता..

May 20, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणामुळे देशभरात तर खळबळ उडालीच पण लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआयच्या तपासात अनेक धागेदोर समोर येत आहेत. याच पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्थात मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी कुलकर्णी हा संबंधित होता, अशी माहिती समोर आली. त्याच्या अटकेने प्रचंड खळबळ माजली.

आता याच पी.व्ही. कुलकर्णीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सध्या तुरूंगाच्या गजाईड असलेल्या पी.व्ही कुलकर्णी याचे बीड शहरातील शाहूनगर भागात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्याचं बांधकाम विनापरवान असल्याचं उघड झालं असून आता त्यावर तोडक कारवाई होणार आहे. नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

विनापरवाना बांधकाम, तोडक कारवाई होणार

बीड शहरामध्ये शाहूनगर भागात एक अनधिकृत बांधकाम, विनापरवानगी बांधकाम सुरू आहे. आणि ते नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही कुलकर्णी याचे इमारतीचे बांधकाम आहे. मात्र यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेच्या नगररचना कार्यालय आणि मालमत्ता कर विभागाने पाहणी केली तसेच चौकशीही करण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहे. त्या बांधकामाची परवानगीची संचिका आम्ही तपासली, मात्र कुलकर्णी याच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच चारही बाजूने नियमानुसार सोडल्या जाणाऱ्या जागेतही बांधकाम करण्यात आलं आहे. यामुळे या बांधकामाशी संबंधित सर्व होल्डर्सना नोटीसा बजावून पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच तोडक कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी दिली आहे.

त्यामुळे कुलकर्णी याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून ते बांधकाम लवकरच पाडलं जाणार असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहे पी.व्ही. कुलकर्णी ?

2026 च्या नीट पेपरफुटीमध्ये महाराष्ट्र मॉड्यूलने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून नीटचे पेपर तयार करणाऱ्या ‘एनटीए’च्या राष्ट्रीय पॅनेलवर कार्यरत होते. त्यामुळे त्याच्याकडे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे उपलब्ध होत्या. पी.व्ही. कुलकर्णी पुण्यात विद्यार्थ्यांसाठी घरगुती शिकवणी वर्ग चालवायचा. या वर्गांमध्ये तो विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न (Guess Paper) म्हणून प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न वहीत लिहून घ्यायला सांगायचा. या रॅकेटमध्ये पी. व्ही. कुलकर्णी याने मनीषा वाघमारे हिच्याशी हातमिळवणी केली होती अशी माहिती समोर आली. कुलकर्णी हा सध्या सीबीआय कोठडीत आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बँकेपेक्षा जास्त कमाई! जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी, पाहा लेटेस्ट व्याजदरांची यादी
  • ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन
  • ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in