
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मुंबईत काल गणेश आगमन मिरवणुका पार पडल्या. अनेक मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती काल मंडपात विराजमान झाल्या. यावेळी माझगाव मोरया गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीत तणाव निर्माण झाला होता. माझगाव मोरया गणपती आगमनाच्या मिरवणुकीवर कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीमधून अंड आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर आता भाजप नेते राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे बोलले आहेत. “अंडी फेकण्याचे प्रकार होत असतील तर ईद येतेय हे लक्षात ठेवा” असा इशारा त्यांनी दिला.
“आमचे हिंदू सण सहन होत नसतील, ज्या देशात 90 टक्के हिंदू राहतात. हिंदू राष्ट्रात राहून हिंदू सणांवर गणेशोत्सवावर, मिरवणुकीवर दगडफेक, अंड फेकीचे प्रकार होत असतील तर पोलीस कारवाई करतीलच. केली पण आहे. सगळ्या केसेस घेतल्या आहेत” असं नितेश राणे यांनी सांगितलं. “हिंदुंच्या ज्या भावना आहेत, हिंदू सणांच्या बाबतीत असे प्रकार होत असतील तर असे जिहादी ज्या बिळात लपले आहेत, त्यांना सोडणार नाही” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
कायद्याचं पालन करण्याचा ठेका हिंदुंनी घेतलेला नाही
“हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार असताना आम्ही हे प्रकार सहन करणार नाही. केस दाखल झालेली आहे. पोलिसांनी योग्यपणे प्रकरण हाताळलं आहे. पण अशा पद्धतीने अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांविरोधात होत असतील, गणेश मिरवणुकीच्या बाबतीत हे घडत असेल तर ईदपण कुठेतरी येतेय हे लक्षात ठेवा. मोहरमचा दिवस पण येईल. धर्म रक्षणासाठी आमच्या भगवद् गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची सुद्धा मुभा दिलीय, हे लक्षात ठेवा. कायद्याचं पालन करण्याचा ठेका हिंदुंनी घेतलेला नाही” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
पुढे बघा कसा कार्यक्रम होतो
“सर्व धर्म समभाव, सेक्युलर, फेक्युलर हे जे कोण टेपरेकॉर्डर आहेत ते कुठल्या बिळात लपले आहेत? अशा पद्धतीने हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने, जिहादी ज्या बिल्डिंगमध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे त्यांची नावं आलेली आहेत. पुढे बघा कसा कार्यक्रम होतो” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
Leave a Reply