
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. दरम्यान अद्याप शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. यावर बोलताना आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेगात सुरू आहे, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली आहे. कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना, त्यांना असत्यच आहे,’ अशी वागणूक देण्यात आली. असं ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले सरोदे?
उद्धव ठाकरे यांची बाजू जणू काय असत्यच आहे, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांना वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे मला ते अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात. उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ राजकीय पक्षातील नेत्यांच्या झुंडीनेच अन्याय केलेला नाही, तर राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी देखील त्यांच्यावर अन्याय केला आहे. सुप्रीम कोर्टात देखील या प्रकरणाला प्रचंड विलंब झाला आहे, या अर्थाने हा सद्धा अन्यायच आहे. त्यामुळेच मला उद्धव ठाकरे हे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना इतक्या वर्ष कोणताही न्याय मिळालेला नाहीये, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती. शिवसेना पक्षाचे दोन गट पडले. एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट दरम्यान त्यामुळे शिवसेना पक्षाचं चिन्ह कोणाला द्यायचं असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर होता. विधीमंडळ पक्षाचं बळ पहातात निवडणूक आयोगाने शिवेसना पक्षाचं चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडत आहेत.
Leave a Reply