तामिळनाडूमध्ये धावत्या ट्रेनमधून थोडथोडकं नव्हे तर तब्बल 3 किलो सोनं चोरीला गेल्याची केस समोर आली आणि पोलिसही हैराण झाले. त्यांच्यासमोर मोठं आव्हानंच उभं राहिलं. मात्र चोराने केलेली एक छोटीशी चूक त्याला नडली आणि क्षणात त्याचा खेळ खल्लास झाला. ती चूक म्हणजे फेकून दिलेल्या बॅगेत असलेलं स्मार्टवॉच ! वाचून तुम्हीही चक्रावलात ना, पण हे खरं आहे. […]
india
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक… मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या रोगांच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, शहरात मलेरियाचे एकूण 3,177 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच काळात, डेंग्यूचे 1,069 रुग्ण आणि लेप्टोस्पायरोसिसचे 189 रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी मुंबईतील सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठे आव्हान निर्माण करत आहे. या आकडेवारीची […]
2 दिवसांत येतो म्हणत आईला सोडून गेला, मृत्यूनंतरही पाझर नाही फुटला.. त्या वृद्धेची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
आई-वडील आयुष्यभर काबाडकष्ट करून, अक्षरश: आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना चांगलं आयुष्य, सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश मुलांना आई-वडीलांच्या कष्टांची जाणीव असते, मोठेपणी ते त्यांची काळजी घेताना दिसतात, त्यांचा वृद्धापकाळ सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र काही वेळा अशा घटना समोर येतात जिथे मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा […]
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे… सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्षाच्या फुटीसंदर्भातील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याचे त्यांनी सांगितले. सावंत यांच्या मते, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काम केले आहे. काँग्रेस पक्षाच्या फुटीशी शिवसेनेच्या फुटीची तुलना योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी आमदार, खासदार आणि पदाधिकारी […]
आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार… आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा
कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. आसाममधील हिंमता बिस्वा सरमा सरकारने अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम थेट त्यांच्या पहिल्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा आज करण्यात आली. हा नियम खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे […]
दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं, सांगलीत खळबळ
सांगलीतून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 15 ऑगस्ट रोजी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पती-पत्नीवर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर मनीषा केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता त्यांचे पती […]