• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

August 25, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेसोबत सुरू असलेल्या ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर कॅनडाने मोठी कारवाई करत अमेरिकन उत्पादनांवर 20 अब्ज डॉलरचा कस्टम ड्युटी लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा प्रतिकार म्हणून कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. यासोबतच आपल्या व्यवसायांना आणि कर्मचाऱ्यांना या निर्णयाच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी कॅनडाने अब्जावधी डॉलरच्या मदत पॅकेजचीही घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कॅनडाकडून लावण्यात येणारे हे टॅरिफ 8 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या टॅरिफची एकूण किंमत 19.94 अब्ज डॉलर इतकी आहे. यामध्ये अमेरिकेतून आयात होणाऱ्या जवळपास 700 उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांवर 15 ते 50 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. कॅनडाच्या या निर्णयामुळे आता दोन मजबूत अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून अमेरिका आणि कॅनडामधील संबंधांमध्ये सातत्याने तणाव वाढताना दिसत आहे.

स्टील, अॅल्युमिनियम आणि कपड्यांवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ

कॅनडाने ज्या अमेरिकन उत्पादनांवर कस्टम ड्युटी लावण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, फर्निचर आणि कपडे यांचा समावेश आहे. या उत्पादनांवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू होणार आहे. तर घरगुती उपकरणे आणि काही सीफूड उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. कॅनडाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि टूल्सवर 15 टक्के टॅरिफ लागू केला जाणार आहे.

कॅनडाचे अर्थमंत्री फ्रांस्वा-फिलिप शॅम्पेन काय म्हणाले?

कॅनडाने आपली ही कारवाई काही निवडक उत्पादनांपुरतीच मर्यादित ठेवली आहे. कॅनडाचे अर्थमंत्री फ्रांस्वा-फिलिप शॅम्पेन यांनी सांगितले की, सरकारने या प्रकरणात प्रमाणबद्ध भूमिका घेतली आहे. व्यवसायाशी संबंधित वादांमधील अनुभवाचा आधार घेत अमेरिकन उत्पादनांवर जवाबी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने नुकतेच लागू केलेले टॅरिफ छोटे आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांवर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे कॅनडा सरकारने टॅरिफसोबतच व्यवसायांसाठी मोठ्या सपोर्ट पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे कॅनडातील कंपन्यांना देशांतर्गत बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.

2025 पासून सुरू आहे अमेरिका-कॅनडामधील ट्रेड वॉर

अमेरिका आणि कॅनडामधील सध्याचा संघर्ष हा 2025 मध्ये सुरू झालेल्या ट्रेड वॉरचा भाग आहे. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमा सुरक्षा आणि फेंटानिलच्या तस्करीबाबत चिंता व्यक्त करत कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in