वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम सामन्यात कोणते दोन संघ पोहोचणार? यासाठी जोरदार चुरस आहे. ऑस्ट्रेलियाचं नाव आघाडीवर आहे, तर दुसऱ्या संघासाठी चढाओढ आहे. अशा स्थितीत भारतासाठी श्रीलंका दौरा खूपच महत्त्वाचा आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाने झेल पकडण्याचा जोरदार सराव केला. कारण मागच्या तीन महिन्यात भारतीय खेळाडूंना झेल सोडण्याची लागण लागली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या भूमीत उतरताच […]
cricket
वैभव सूर्यवंशीचं दुबळ्या बाजूवर जोरदार काम सुरू, 10 दिवसांसाठी एकाच ठिकाणी तळ ठोकला
वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला इंग्लंड दौऱ्यापासून सुरूवात झाली आहे. या दौऱ्यात त्याच्या फलंदाजीतून काही खास घडलं नाही. पण त्याची वसुली त्याने झिम्बाब्वे दौऱ्यातील टी20 मालिकेत केली. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावून विक्रम रचला. झिम्बाब्वे दौरा संपल्यानंतर आता टी20 मालिकांसाठी अवकाश असून टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे वैभव […]
IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा
भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुचर्चिक कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन सामने होणार असून भारतीय संघ 9 वर्षांनी श्रीलंकेत दाखल झाला आहे. 9 वर्षापूर्वी भारताने श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकन भूमीत कसोटी […]
Cricket Awards: ट्रेव्हिस हेडच्या शिरपेचात सलग दुसऱ्यांदा मानाचा तुरा, या तीन खेळाडूंचाही सन्मान
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने क्रिकेट पुरस्काराची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात देशासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पुन्हा एकदा ट्रेव्हिस हेडने मागच्या वर्षी केलेल्या कामगिरीच्या जोरावर एलन बॉर्डर मेडल पटकावलं. (फोटो-GETTY IMAGES) एलन बॉर्डर मेडल हे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. मागच्या वर्षीही ट्रेव्हिस हेडला हा पुरस्कार मिळाला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय […]
IND vs SLXI: सराव सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेची पकड, भारताने त्याच चुकांचा पाढा वाचला
भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवसखेर श्रीलंकेने 8 गडी गमवून 363 धावा केल्या. यासह पहिला दिवस श्रीलंकन फलंदाजांनी गाजवला असं म्हणायला हरकत नाही. श्रीलंकेचे फलंदाज बाद करताना भारतीय गोलंदाजांचा कस लागला. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. सराव सामन्यातून धडे घेऊन भारताने आता पुढची […]
Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे टी20 लीग स्पर्धेसाठी सज्ज, संघाकडून त्याच्या नावाची घोषणा
भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलला नुकताच रामराम ठोकला. त्यानंतर आता विदेशी टी20 लीग स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर निवृत्ती घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे कोचिंग किंवा समालोचकाच्या भूमिकेत दिसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र त्याने आता व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या […]