
Bigg Bosss 20 : अभिनेता सलमान खान याचा लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस 20’ आज पासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शो पुन्हा नव्याने सुरु होणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोचा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) वर होणार आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात, निर्माते शोमधील स्पर्धकांची नावे एकामागून एक जाहीर करत आहेत. आता, भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खाजदार मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारी हिने ‘बिग बॉस 20’ मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.
लेकीला बिग बॉसच्या घरात सोडण्यासाठी पोहोचले मनोज तिवारी?
जियो हॉटस्टारने ‘बिग बॉस 20’ शो चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. जेथे रीती हिला सोडण्यासाठी मनोज तिवारी आले. ‘रिंकिया के पापा’ गाणं गात त्यांनी स्टेजवर प्रवेश केला. त्यानंतर सलमान खान म्हणतो, ‘मी आता तथास्तू बोललो तर तुम्ही विचार कराय या शोमध्ये दोन वेळा येऊ शकतो…’, यावर मनोज तिवारी म्हणाले, ‘मी माझ्या लेकीला बिग बॉसच्या घरात सोडायला येणार आहे…’, सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सध्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनेकांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. निर्मात्यांनी आता स्वतः रीती हिच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. आता तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. सांगायचं झालं तर, यापूर्वी मनोज तिवरी देखील ‘बिग बॉस 4’मध्ये झळकले होते.
तेव्हा देखील सलमान खान याने होस्ट केलं होतं. त्या सीझनमध्ये डॉली बिंद्रासोबतचा त्यांचा ‘अंड्यावरून झालेला वाद’ विशेष चर्चेत राहिला होता आणि श्वेता तिवारी हिने ट्रॉफी जिंकलेली होती. सांगायचं झालं तर, मनोज तिवारी आणि श्वेता तिवारी यांच्या मैत्रीच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. त्यामुळे शो तुफान चर्चेत आलेला.
Leave a Reply