
सोमवारी पहाटे अमरावतीमध्ये घडलेल्या भयानक घटनेने फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3.30 च्या सुमारास अचानक आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि बघता बघता तिने रौद्र रूप धारण केलं. या दुर्दैवी घटनेमध्ये तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर काही बाळं ही जखमी झाली. रुग्णालयातील या घटनेने अख्ख्या राज्यात हलहळ व्यक्त होत असून ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, ते कालबाह्य झाले होते का? त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. दरम्यान आगीच्या या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यांनी आगीच्या दुर्घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतली.’ नवजात शिशूच्या मृत्यूच्या सखोल चौकशी साठी समिती गठीत करणार’ अशी घोषणा आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. आठ दिवसात त्या समितीचा अहवाल समोर येईल. दोषींवर निश्चतपणे कारवाई केल्या जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
काय म्हणाले प्रकाश आबिटकर ?
अमरावतीच्या रुग्णालयात ती घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. याच दुर्दैवी घटनेतून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि जे यासाठी दोषी असतील त्यांना जबाबदार धरावं लागेल. व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतला दोष असेल.. जे दोषी असतील त्यांची गय केली जाणारा नाही. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, आम्ही बाकी सगळं करू, पण जी तीन बालकं गेली, त्यांच्या कुटुंबियांना जे दु:ख झालं, ते कशानीही भरून येणार नाही. याइतकं दुर्दैवी काहीच नाही, असं आबिटकर म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply