• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aamir Khan’s Wedding: भर पावसात राज ठाकरे पोहोचले आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला; दोघांच्या मैत्रीची चर्चा

July 5, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करत आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर तिसरं लग्न करत असल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. आज (5 जुलै, 2026) मुंबईत राहत्या घरी विशेष विवाह कायद्याअंतर्गत तो गौरीशी लग्न करत आहे. या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराला बोलावण्यात आलं आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे. भर पावसात राज ठाकरे आमिर खानच्या लग्नाला पोहोचले असून त्याचा फोटो समोर आला आहे.

राज ठाकरे आणि आमिर खान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याआधी ईदच्या निमित्तानेही राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमिर खानच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी भेटीनंतर राज ठाकरे यांना निरोप देण्यासाठी आमिर घरातून अनवाणी बाहेर आला होता. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एखाद्या चित्रपटासंदर्भात काही अडचण आल्यास, आमिरसुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं याआधी अनेकदा पहायला मिळालं आहे. त्यामुळे आयुष्याच्या या अत्यंत खास क्षणी आमिरने आवर्जून राज ठाकरेंना यांना आमंत्रित केलं आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राज ठाकरे यांच्याशिवाय मुकेश अंबानी, ‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर, अभिनेत्री एली अवराम, मुलगा जुनैद खान, मुलगी आयरा खान हेसुद्धा आमिरच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची पहिली भेट जवळपास 25 वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये चुलत बहीण नुझात खानच्या माध्यमातून त्याचा बंगळुरूमध्ये पुन्हा गौरीशी संपर्क झाला. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू त्याचं प्रेमात रुपांतर झालं. हे दोघं जवळपास एक वर्ष लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मार्च 2025 मध्ये आमिरने त्याच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तिला माध्यमांसमोर आपली पार्टनर म्हणून ओळख करून दिली.

गौरी लग्नाच्या आधीपासून तिच्या मुलासोबत बंगळुरूहून मुंबईत स्थायिक झाली होती. पूर्वी एका हेअरकेअर ब्रँडमध्ये काम करणारी गौरी आता आमिरला त्याच्या ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली मदत करते. गेल्या वर्षभरापासून आमिर आणि गौरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या महिन्यात या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आमिरने त्यावर शिक्कामोर्तब केला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी माणूस बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो आणि… परप्रांतीय तरुणाचे वादग्रस्त विधान
  • फक्त 3.50 लाखात घरी आणा ही नवीन कार, देते 34 किमी मायलेज, घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी
  • मला मेंटली टॉर्चर केलं जातंय..; दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप, अजितदादा असते तर..
  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in