• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aamir Khan : तिसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना आमिरने सुनावलं, गौरीविषयी केला मोठा खुलासा, लव्ह जिहादच्या आरोपावर..

July 15, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट , अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पर्सनल आयुष्यामुळे बराच चर्चेत आलाय. 5 जुलै रोजी आमिरने त्याची मैत्रीण गौर स्प्रॅट हिच्याशी लग्न केलं. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहाचे फोटो , व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले, व्हायरलही झाले. मात्र याच लग्नावरून आमिरला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 61 वर्षांच्या आमिर खानचं हे तिसरं लग्न असून यापूर्वी त्याने रीना दत्ता आणि त्यानंतर किरण राव यांच्याशी लग्न केलं. मात्र त्याचे दोन्ही संसार मोडले. त्यानंतर आता तो पुन्हा गौरीशी विवाहबद्ध झाला. आमिरची तीन लग्न, त्याच्या आधीच्या दोन पत्नी आणि आत तिसरी पत्नीही हिंदू असल्यामुळे, एकंदरच याप्रकरणावरून जोरदार टीका झाली. अनेकांनी त्याला ट्रोल केलं, काही राजकीय नेत्यांनी तर आमिरला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर, असंच म्हटलं. एवढंच नव्हे तर चीफ मुफ्ती यांनी आमिरच्या लग्नावरून फतवा जारी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून ते चांगलंच तापतना दिसतंय.

या मुद्यावरून इतके दिवस शांत असलेल्या, काहीच न बोलणाऱ्या आमिर खानने आता मात्र मौन सोडलं असून ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तिसरं लग्न, लव्ह जिहाद, ट्रोलिंग यावरून आमिर स्पष्टपणे बोलला असून त्याने त्याची पत्नी गौरी स्प्रॅटबद्दल मोठा खुलासाही केला आहे.

तिसऱ्या लग्नावर बोलला आमिर खान

तिसऱ्या लग्नामुळे सोशल मीडियावर टीकेचा सामना करणारा अभिनेता आमिर खान याने आपल्या कुटुंबाच्या विचारसरणीबाबत भाष्य केलं आहे. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत तो सर्व विषयांवर खुलेपणाने, अगदी स्पष्ट बोलला. ” माझं कुटुंब नेहमीच सर्व धर्मांचा आदर करणारं आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं आहे. खरं तर आमचं कुटुंब खूप मोकळ्या विचारांचे आणि प्रेमळ आहे. माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न हिंदू व्यक्तींशी झाले आहे. माझ्या मुलीचे लग्नही हिंदूशी झालं आहे. माझा चुलत भाऊ मंसूर यांनी ख्रिश्चन महिलेशी लग्न केलं आहे” असं आमिर म्हणाला.

“गौरी, रीना आणि किरण यांनी माझ्याशी लग्न करताना धर्म बदललेला नाही , आमचे लग्न सिव्हिल मॅरेज पद्धतीने झाले होतं असं पुढे आपल्या विवाहांबाबत बोलताना आमिरने स्पष्ट केलं. एवढंच नव्हे तर त्याने त्याची पत्नी गौरी स्प्रॅटच्या धर्माबद्दलही मोठा खुलासा केला. “गौरी हिंदू नाहीत, ती ख्रिश्चन आहेत” असं त्याने सांगितलं. “गौरी अशी ख्रिश्चन आहेत जी धर्माचे कठोरपणे पालन करत नाहीत. जसजसा काळ पुढे जातोय, तसतसं आयुष्य अधिक रंजक आणि आनंददायी होतंय” असंही आमिरने यावेळी नमूद केलं.

100 कोटीच्या घरात पूर्व पत्नीही राहणार ?

दरम्यान, मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरात १०० कोटी रुपयांची मल्टी-जेनरेशनल स्कायव्हिला उभारण्याच्या चर्चांवरही आमिर खानने खुलासा केला. “आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास सुरू आहे. मुंबईतील अनेक इमारतींचा जसा पुनर्विकास होत आहे, त्याचप्रमाणे हा आमच्या हाऊसिंग सोसायटीचा निर्णय आहे. या सोसायटीमध्ये माझ्यासह 24 सदस्य आहेत. यामध्ये एक बिल्डरही सहभागी आहे, ज्याने अनेक फ्लॅट खरेदी केले आहेत आणि त्यामुळे इमारतीतील मोठा हिस्सा त्याच्या मालकीचा आहे.” असं आमिरने सांगितलं.

आमिरच पूर्वायुष्य

आमिर खान याचं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्याशी झालं होतं. या लग्नापासून त्या दोघांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. त्यानंतर ते वेगळे झाले. काही काळाने आमिर खान याने किरण राव हिच्याशी दुसरं लग्न केलं, त्या दोघांना आझाद हा मुलगा आहे. मात्र काही वर्षांपूर्वी किरण आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरची गौरीशी भेट झाली. 60 व्या वाढदिवसावेळी आमिरने गौरीह नात्यात असल्याचा खुलासा केला. 5 जुलै 2026 रोजी कुटुंबीय आणि जवळच्या



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in