
Kanpur News : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका हायप्रोफाईल हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. आता या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. रतन ऑर्बिटमध्ये झालेल्या या हत्याकांडाची मास्टरमाइंड करोडपती सूनच निघाली आहे. शालू असं या सूनेचं नाव आहे. औषधांचा व्यापारी असलेल्या सासऱ्याकडून कमी पैसे मिळत असल्याने तिने सासऱ्याचा कायमचा काटा काढण्याचं षडयंत्र रचलं. सातत्याने टोमणे मारले जायचे. त्यामुळे मी त्रस्त होते. माझी प्रायव्हसीही निघून गेली होती, असा दावा शालूने केला आहे. त्यामुळे विनीत मिनोच हत्याकांडाला आता नवं वळण मिळालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 30 वर्षीय शालूने पोलिसांकडे कबुली दिली आहे. घरात तिच्यावर अनेक बंधनं होती. शिवाय खर्चाला कमी पैसे मिळत होती. त्यामुळे ती नाराज होती. कोट्यधीश कुटुंबातील सून असूनही मला बाहेर जाण्यापासून वारंवार रोखलं जायचं. पार्टी जायला मनाई होती. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मुलगा आणि सूनेला पगार द्यावा असा पेमेंट दिला जात होता. त्यामुळे शालू त्रस्त होती.
पहिला प्लान फेल
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशाल गौतम आणि राज किशोर असं या दोन्ही आरोपींची नावे आहेत. जन्माष्टमीच्याच दिवशी विनीत मिनोच यांची हत्या करण्याचा प्लान होता. त्या दिवशी शालूने तो शिवम असल्याचं सांगून त्याला घरात प्रवेस दिला होता. गेटवर गार्डला नोंदणी करण्यास मनाई करण्यात आली. पण जन्माष्टमीच्या दिवशी प्लान यशस्वी झाला नसल्याचं विशालने पोलिसांना सांगितलं आहे.
त्यानंतर शनिवारी हत्या करण्याचा डाव रचण्यात आला. शालू तिचा नवरा आणि मुलांसोबत पार्टीला गेली. त्यानंतर 10 मिनिटांनी दोन आरोपी बनावट चावीने दरवाजा उघडून घरात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोन्ही आरोपी दिसत आहे. विशाल टाळा खोलताना प्रयत्न करताना दिसत आहे. पण ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडत नाहीये. त्यामुळे तो दुसऱ्यांदा प्रयत्न करताना दिसतो.
भिंतीवरून पळाले
विनीत यांची हत्या केल्यानंतर विशाल आणि राजकिशोर यांच्या हाताला, तोंडाल आणि कपड्यांना रक्त लागलेलं होतं. त्यानंतर दोघांनी हातपाय धुतले आणि खाली आले. त्यानंतर दोघे मुख्य दरवाजातून बाहेर गेले नाही. बाजूलाच असलेल्या पार्कमधून भिंतीवरून उडी मारून पळाले. मुख्य दरवाजातून गेलो असतो तर कपड्यावरील रक्ताच्या डागांमुळे पकडले गेलो असतो. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागलं, अशी कबुली या दोघांनी दिली आहे.
शालूचे फोन कॉल्स
दरम्यान, विशाल गौतम आणि शालूच्या फोनचा सीडीआर काढण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. हत्येच्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या दोघांमध्ये 12 वेळा फोनवरून चर्चा झाली. दोघंही फार वेळ बोलले नाही. प्रत्येक कॉल हा एक किंवा दीड मिनिटाचा होता. यात व्हॉट्सअप आणि नियमित कॉलचाही समावेश आहे. विशालच्या फोनमध्ये पोलिसांना एक मेसेज मिळाला होता. आम्ही निघत आहोत, असं या मेसेजमध्ये म्हटलं होतं. या मेसेजमुळेच पोलिसांचा शालूवर संशय बळावला. आणि त्यातून या हत्याकांडाचा उलगडा झाला.
Leave a Reply