मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज कुटुंब तुमच्यासाठी केंद्रस्थानी राहणार आहे. घरातील वातावरणात आपलेपणा आणि भावनिक ऊब जाणवेल. एखादी जुनी आठवण मनात घर करू शकते किंवा एखाद्या जुन्या नात्याचे महत्त्व पुन्हा जाणवेल. मात्र, फक्त स्वतःच्या भावना न पाहता कुटुंबातील इतरांचे मतही समजून घ्या. भाऊ-बहिणींशी बोलताना शब्द जपून वापरा; छोट्या विषयाचे रूपांतर वादात होऊ शकते. […]
Archives for August 2026
मुंबईत अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू तर 6 जखमी, 12 मजली इमारतीला भीषण आग..
मुंबईतील विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीला काल रात्री 10 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची पातळी लेव्हल-2 होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, ही आग नक्की कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. विले पार्ले येथील शांता भुवन येथील इमारतीला आग लागली हाती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न […]
घाटकोपरमध्ये कोसळली दरड, पाच ते सहा जण अडकल्याची माहिती
मुंबईतील घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रीभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. […]
Ayodhay Ram Temple Donation Theft Case : प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड करण्यासाठीच उद्धव ठाकरेंची निवड केलीय, शिवसेना नेत्याचा दावा
“बाबरी मशीद पाडली तेव्हा हिंदू समाजाच्या मागे कोण उभं राहिलं, ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राम मंदिर उभारण्यासाठी तुमचं योगदान काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप नेते विचारू लागलेत” अशी टीका ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केली. उद्धव ठाकरे यांची झालेली निवड ही प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड […]
अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्यवधींचा मालक, संपत्ती आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ!
वैभव सूर्यवंशीने वयाच्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याच्यावर आयपीएलमध्ये बोली लागली होती. त्यासाठी तेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 1.1 कोटी रुपये मोजले होते. सर्वात कमी वयात आयपीएल खेळणारा खेळाडू त्याची नोंद झाली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. कमी वयात त्याने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम नोंदवले. तसेच […]
‘तुमच्या मतांची भीक आम्हाला नको’, राहुरीच्या भाजप आमदाराची भाषा व्हायरल
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 4 दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अहिल्यानगर बंद दरम्यान भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. ‘आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्ही […]