शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तकचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डिलीमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे. डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला […]
Archives for July 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
शिर्डी साईबाबा संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसभर रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रक्तदान शिबिरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. आयोजकांच्या माहितीनुसार, 100 हून अधिक भाविकांनी रक्तदान केले. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी रक्ताचा […]
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असून, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद भवनात भेट घेतली आहे. लोकसभेचं कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर ही बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेतील कामकाज स्थगित झाल्यानंतर किरण रिजिजू थेट अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले. […]
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर… लोकसभेत प्रचंड गदारोळ
मोठी घडामोड समोर आली आहे. परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. लोकसभेतील गेल्या दोन दिवसांच्या गदारोळानंतर अखेर हे महत्त्वाचं विधेयक मंजूर झालं आहे. या परीक्षा सुधारणा विधेयकात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदी भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे सत्ताधारी पक्षाचे मत आहे. नीट पेपरफुटीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलेच तापले […]
CWG 2026: नीरज चोप्रा VS अरशद नदीम, पुन्हा भारत पाकिस्तान आमनेसामने! सामन्याबाबत जाणून घ्या
कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील भालाफेक प्रकारात क्रीडाप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. भालाफेक पात्रता फेरी 30 जुलैला पार पडणार आहे. यात जगभरातील 18 भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. यातील निश्चित अंतर पार करणाऱ्या टॉप 12 खेळाडूंना अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांचा फॉर्म पाहता त्यांना टॉप 12 मध्ये […]
Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचं करिअर उद्ध्वस्त? वडिलांच्या दाव्याने खळबळ
दिल्लीत जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने आंदोलक विद्यार्थी सहभागी झाले. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे विद्यार्थांच्या आंदोलनाचे यश मानले जात आहे. आता अभिजीत दीपकेचे आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर […]