• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: नीरज चोप्रा VS अरशद नदीम, पुन्हा भारत पाकिस्तान आमनेसामने! सामन्याबाबत जाणून घ्या

July 29, 2026 by admin Leave a Comment


कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील भालाफेक प्रकारात क्रीडाप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. भालाफेक पात्रता फेरी 30 जुलैला पार पडणार आहे. यात जगभरातील 18 भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. यातील निश्चित अंतर पार करणाऱ्या टॉप 12 खेळाडूंना अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांचा फॉर्म पाहता त्यांना टॉप 12 मध्ये सहज स्थान मिळेल असं दिसतंय. या स्पर्धेत भारताकडून केवळ नीरज चोप्रा नाही, तर रोहित यादव आणि यश वीर सिंग हे दोन तरुण भालाफेकपटूही भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन खेळाडूंनी पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली तर त्यांनाही अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत 30 जुलैला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या नजरा या स्पर्धेकडे लागून आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 पुरुष भालाफेक पात्रता फेरीतील खेळाडू

  • कॅमेरॉन मॅकएंटायर (ऑस्ट्रेलिया)
  • कीशॉन स्ट्राचेन (बहामास)
  • बेन ईस्ट (इंग्लंड)
  • अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा)
  • नीरज चोप्रा (भारत)
  • रोहित यादव (भारत)
  • यश वीर सिंग (भारत)
  • एल्विस ग्रॅहम (जमैका)
  • ज्युलियस येगो (केनिया)
  • चिनेचेरेम न्नामदी (नायजेरिया)
  • अर्शद नदीम (पाकिस्तान)
  • मुहम्मद यासिर (पाकिस्तान)
  • लकोना गेरेगा (पापुआ न्यू गिनी)
  • डौ स्मिट (दक्षिण आफ्रिका)
  • रुमेश थरंगा पाथिरागे (श्रीलंका)
  • सुमेधा रणसिंगे (श्रीलंका)
  • केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो)
  • उसूफोनो इनेली (टुवालू)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत नीरज चोप्रासमोर यावेळी कठीण आव्हान असणार आहे. गतविजेता पाकिस्तानी अरशद नदीम , श्रीलंकेचा रुमेश थरंगा पाथिरागे, दोन वेळचा माजी विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट हे प्रतिस्पर्धी असतील.

भारतात थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?

कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. भालाफेकीसह सर्व ॲथलेटिक्स स्पर्धांचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

पुरुषांच्या भालाफेक पात्रता फेरी

दिनांक: 30 जुलै (गुरुवार)
वेळ: दुपारी 2:55 (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

पुरुषांची भालाफेक अंतिम फेरी (पात्र ठरल्यास)

दिनांक: 31 जुलै (1 ऑगस्ट पहाटे)
वेळ: रात्री 12:45 (भारतीय प्रमाणवेळेनुसार)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in