सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज तरुणांच्या आक्रोशाचा बांध फुटला. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी दिल्ली दणाणून सोडली. तरुणांपासून वृद्घांपर्यंत सर्वच जण या आंदोलनात सहभागी झाले होते. नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज तर काल रात्रीपासूनच जंतरमंतरवर ठाण मांडून होते. सामान्य नागरिकांपर्यंत तेही तरुणांचे आवाज बनून उभे होते. सर्व स्टारडम […]
Archives for July 2026
विश्वगुरू झुरळांना घाबरतात… कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजीत दिपके यांनी संसदवर मोर्चा काढला आहे. आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र पोलिसांकडून या आंदोलनाला विरोध केला जात आहे. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या आंदोलनावरून केंद्र […]
भारतात पहिल्या डेंग्यू व्हॅक्सीनला मंजूरी, QDENGA लसीची WHO ने देखील केली शिफारस
डासांपासून होणाऱ्या जीवघेण्या आजारात डेंग्यू सर्वाधिक धोकादायक म्हटला जात असतो. दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया सारखे आजार डोकेवर काढत असतात. आता डेंग्यूच्या आजारावर बचावासाठी एका लसीला मंजूरी मिळाली असल्याने डेंग्यूच्या धोक्यापासून प्रतिबंधात्मक उपाय सापडला आहे. या प्रतिबंधात्मक व्हॅक्सीनचे नाव QDENGA (क्यूडेंगा) आहे. या लसीला जपानची फार्मा कंपनी Takeda ने तयार केले आहे. भारतात ड्रग कंट्रोलर जनरलनी(DCGI) […]
CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं
नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामुळे संसद भवन परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. यात असंख्य आंदोलन जखमी झाले. 'इन्कलाब जिंदाबाद'च्या घोषणा देत मोठ्य संख्येने आंदोलकांनी […]
आयटीआर भरूनही ‘हे’ काम केले नाही तर रिटर्न ठरेल अमान्य; 30 दिवसांचा नियम नक्की जाणून घ्या!
करदात्यांनी आयटीआर फाईल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणे हा प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, फाईल केल्यापासून 30 दिवसांच्या आत व्हेरिफिकेशन न झाल्यास तुमचे रिटर्न भरलेच नाही असे मानले जाईल. यामुळे तुमचे रिफंड अडकू शकतात आणि तुम्हाला विलंबाबद्दल मोठा दंड किंवा नोटीसचा सामना करावा लागू शकतो. प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर […]
तब्येतीवरून रील व्हायरल होताच सलमानने पोस्ट केले 5 फोटो; ‘भाईजान’ला झालंय तरी काय?
शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी भाईजानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान याने रविवारी स्वतः सलमान खान याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले. अभिनेत्याने स्वतःचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो […]