महाराष्ट्रच काय तर भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखादी वाहिनी एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा करतेय. पाठराखीण, सुना येती घरा, विसरु नका मला, आमच्या लाडक्या नाईक बाई, मराठी मिडीयम, मी कात टाकली, आता होऊ दे धिंगाणा 5 आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव अशा तब्बल 8 नव्या कार्यक्रमांची घोषणा नुकतीच […]
Archives for May 2026
मला मूल नको होतं..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून घटस्फोटामागच्या कारणाचा खुलासा, लग्नाच्या 11 वर्षांनंतर पतीपासून विभक्त
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. 1990 च्या दशकात तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र नंतर तिने स्वत:ला लाइमलाइट आणि कॅमेऱ्यापासून दूर केलं. पूजाने दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. त्याचवेळी तिची भेट मनिष मखिजाशी झाली होती. 2003 मध्ये या दोघांनी खासगी समारंभात लग्न केलं. मात्र लग्नाच्या अकरा […]
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल 1.5 रूपये आणि डिझेल 13 रूपयांनी..
इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळतोय. सतत पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. सरकारने गेल्या 20 दिवसांच्या आत तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. होर्मुज खाडी बंद आहे. कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. त्यामध्येच जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने इराण अमेरिका युद्धात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. यादरम्यानच […]
NIA ची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; 23 वर्षीय तरुण ताब्यात, पाकिस्तानच्या दहशतवाद्याशी संपर्काचा संशय
देशभरात दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA नं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत छत्रपती संभाजीनगरमधूनही एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शेष नारायण असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथला रहिवासी आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून तो वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार म्हणून काम करत […]
IPL 2026: अभिषेक शर्मावर विश्वास टाकणं धोक्याचं! सलग चार चुकांमुळे पोलखोल
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटर फेरीत पराभव होताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हैदराबादचा संघ फक्त 196 धावा करू शकला. या पराभवानंतर अभिषेक शर्माच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo: IPL/BCCI) अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नाही. […]
धक्कादायक! गोल्ड मेडलिस्ट चिराग त्यागीची मित्रानेच गोळ्या झाडून केली हत्या, हॉस्टेलवरुन निघाला अन् रस्त्यात… नेमकं काय घडलं?
दिवसेंदिवस देशातील गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे. गाझियाबादमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय पॅरा-अॅथलीट चिराग त्यागीची थेट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साई उपवन येथे त्याचा मृतदेह आढळून आला. तो सकाळी दिल्लीतील वसतिगृहातून (हॉस्टेल) मुरादनगरमधील बसंतपूर साथली या आपल्या गावी […]