• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल 1.5 रूपये आणि डिझेल 13 रूपयांनी..

May 31, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळतोय. सतत पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. सरकारने गेल्या 20 दिवसांच्या आत तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. होर्मुज खाडी बंद आहे. कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. त्यामध्येच जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने इराण अमेरिका युद्धात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. यादरम्यानच एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढत असतानाच थेट दिलासा मिळालाय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफसंदर्भात अत्यंत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून स्पष्ट केले की, 1 जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील ड्यूटी काढून टाकली जाईल.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पेट्रोलच्या आयातीवर 1.5 रूपये प्रति लीटर आणि डिझेलच्या आयातीवर 13.50 रूपये प्रति लीटर कपात होऊ शकते. एविक्शन टरबाइल फ्यूलच्या आयातीवर लावलेला टॅक्स सरकारने 9.5 रूपये प्रति लीटर कमी केले. इराण अमेरिका युद्धात सतत जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये चढउतार बघायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत.

त्यापैकीच हा देखील एक निर्णय आहे. मात्र, या कपातीचा घरगुती किमतीवर परिणाम होणार नाही. कारण सरकारने घरगुती किमतीवरील टॅक्समध्ये कोणताही बदल केला नाही. विशेष म्हणजे सरकारकडून हा निर्णय अशावेळी घेण्यात आला, ज्यावेळी जागतिक बाजारात थोड्या प्रमाणात कच्च्या तेलावरील किमती कमी झाल्या.

सरकारने 27 मार्च 2026 पासून या टॅक्सी सुरूवात केली होती. मात्र, आता कपात करण्यात आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत बदल होत आहेत, त्यामुळे तेल कंपन्यांवर मोठा दबाव आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले तर परिस्थिती पुन्हा व्यवस्थित होऊ शकते. दोन्ही देशात युद्ध थांबवण्याकरिता चर्चा सुरू आहे. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाली नाही. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in