
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ४,४६२ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाची संगणकीय सोडत जाहीर झाली आहे.
सोडतीमध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पुणे येथील मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिकांचा समावेश आहे
२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव च्या सदनीका आहे
ऑनलाइन अर्ज नोंदणी २४ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून, १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील.
घरांच्या किमती १३ लाखांपासून सुरू होणार असून; EWS साठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख, तर LIG साठी ९ लाख रुपये निश्चित केली आहे.
स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबरला, तर अंतिम यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल.
संगणकीय पद्धतीने ही लॉटरी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता काढण्यात येणार आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी अर्जदारांनी म्हाडाच्या housing.mhada.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
Leave a Reply