• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kangana Ranaut : भूखे-नंगे लोग…कंगना रनौत पुन्हा संतापल्या, रामदेव बाबांविषयी बोलताना म्हणाल्या… ते विधान चर्चेत!

August 24, 2026 by admin Leave a Comment


Kangana Ranaut : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत या चांगल्याच चर्चेत आहेत. दिल्लीतील जेन झी आंदोलनावर केलेल्या भाष्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता कंगना रनौतआणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यातही शाब्दिक वाद रंगला आहे. असे असतानाच आता कंगना राणौत यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. कंगना रनौत यांनी याआधीही रामदेव बाबा यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी रामदेव बाबा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसून, त्यांच्या वक्तव्यामुळे समाजाची मान खाली गेली आहे. सनातन धर्माची प्रतिमा जपण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने महिलांबाबत बोलताना मर्यादा पाळायला हव्यात, असे कंगना रनौत म्हणाल्या.

त्यांच्या सल्ल्याला आपण महत्त्व देणार नाही

तसेच, त्यांनी आशुतोष राणा, सोनू सूद, राखी सावंत आणि तापसी पन्नू यांच्यासह आणखी काही कलाकारांवरही निशाणा साधला. हे कलाकार सातत्याने आपल्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल रानौत यांनी केला. आशुतोष राणा यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत कंगना म्हणाल्या की, ज्यांनी स्वतःच्या क्षेत्रात आपल्याइतके यश मिळवलेले नाही, त्यांच्या सल्ल्याला आपण महत्त्व देणार नाही. सोनू सूद यांनी आपल्याला वागण्याची पद्धत शिकवण्याचा प्रयत्न केला, तर राखी सावंत आणि तापसी पन्नू यांनीही वैयक्तिक पातळीवर टीका केली, असा हल्लाबोल त्यांनी केला. काही जण केवळ माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी आपल्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात, असेही त्या म्हणाल्या.

#WATCH दिल्ली: भाजपा सांसद कंगना रनौत ने कहा, “आए दिन इस तरह के लोग चाहे वो आशुतोष राणा हो जो कहते हैं कि कुत्ते की तरह भौंकती है सोनू सूद कहते हैं कि मुझे तरीका सीखना चाहिए, राखी सावंत जो मेरे चरित्र पर भद्दी टिप्पणी करती हैं, तापसी पन्नू जो मेरे माता-पिता को अपमानित करती हैं इन… pic.twitter.com/verwcwDiYA

— ANI_HindiNews (@AHindinews) August 24, 2026

मी त्यांचं ज्ञान ऐकणार नाही

माध्यमात प्रसिद्धी मिळावी यासाठी लोक मला शिव्या देतात. मी अशा लोकांच्या घाणेरड्या टीका ऐकणारही नाही. अशा हपापलेल्या लोकांवर मला टीका करायची नाही. तापसी पन्नू, राखी सावंत, आशुतोष राणा यासारखे लोक माझ्यावर बोलत आहेत. या लोकांनी माझ्याएवढं 1 टक्केदेखील यश मिळवलेलं नाही. त्यामुळे मी त्यांचं ज्ञान ऐकणार नाही, अशीही ठाम भूमिका त्यांनी घेतील. दरम्यान, आता राखी सावंत, आशुतोष राणा, रामदेव बाबा यासारखे चेहरे कंगना रनौत यांच्या या विधानावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
  • Horoscope Today : चार राशींचे नशीब फळफळणार, करिअर, पैशांबाबत मोठी खुशखबर येणार; काय घडणार?
  • Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
  • महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
  • मिलिट्री मशीनची ताकद, भारतीय सैन्याच्या वाहनांमध्ये का केले जातात खास बदल?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in