• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 च्या डॉलरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो, सरकारचा मोठा निर्णय; पण नाणं मार्केटमध्ये येताच…

September 3, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असलेला 1चा डॉलर मार्केटमध्ये आला आहे. हे नाणं बाजारात येताच त्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच या नाण्यावरून वादही सुरू झाले आहेत. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेच्या करन्सीवर आतापर्यंत कोणत्याही हयात असलेल्या राष्ट्रपतींचा फोटो छापण्यात आलेला नाही. तशी अमेरिकेची परंपराही नाहीये. त्यामुळे ट्रम्प यांचा फोटो असलेलं नाणं कुणी जारी केलं? हे कायद्याला धरून आहे का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

अमेरिकेची टांकसाळ म्हणजे US Mint ने बुधवारी ट्रम्प यांचा फोटो असलेला गोल्डन रंगाचा 1च्या डॉलरचं नाणं बाजारात आणलं आहे. अमेरिकेच्या 250व्या वर्धापन दिनाच्या 2पार्श्वभूमीवर हे नाणं बाजारात आणण्यात आलं आहे. अमेरिकेचं हे यंदाचं 250 वे वर्ष आहे. या नाण्यावर दर्शनी भागावर डोनाल्ड ट्रम्प यांचं चित्र साकारण्यात आलं आहे. त्यासोबतच त्यावर LIBERTY, IN GOD WE TRUST आणि 1776~2026 असं त्यावर लिहिलं आहे. नाण्याच्या पाठच्या बाजूला राष्ट्रपतीची अधिकृत मोहोर असलेली डिझाईन आहे. त्यातील ढालीवर 250 लिहिलं आहे.

हे नाणं अमेरिकेची ओळख, गौरव आणि वारश्याचं प्रतिक आहे, असं यूएस मिंटने म्हटलं आहे. मात्र, ट्रम्प यांचा फोटो असलेल्या या नाण्यावरून आता राजकीय आणि कायदेशीर वाद रंगला आहे.

अमेरिकेचा कायदा काय सांगतो?

अमेरिकेत जीवित लोकांचे फोटो सरकारी मुद्रेवर लावण्याचे जुने नियम आहेत. त्याची सुरुवात 1866मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसने एक नियम बनवला होता. कारण एका सरकारी अधिकाऱ्याने कथितपणे अमेरिकेच्या करन्सीवर आपला फोटो लावला होता. या नियमाला सामान्यपणे Thayer Amendment म्हणून ओळखलं जातं. या नियमांतर्गत अमेरिकन नोटांवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचे चित्र लावण्याची परवानगी नाहीये. मात्र, हा नियम नाण्यांना लागू होत नाही.

अमेरिकेच्या संघीय कायद्यानुसार, अमेरिकेच्या करन्सी आणि सरकारी सेक्युरिटीजवर कोणत्याही मृत व्यक्तीचंच चित्र असलं पाहिजे. ट्रम्प यांच्या समर्थकांना या नियमात बदल करण्यासाठी कायदा आणण्याचाही प्रयत्न केला. परंतु हा प्रस्ताव अजून पुढे सरकू शकलेला नाही.

नाणं वैध कसे?

रिपोर्टनुसार, ट्रम्प यांचा फोटो असलेलं हे नाणं बेकायदेशीर मानलं जाणार नाही. त्याचं कारण म्हणजे 2020मध्ये मंजूर करण्यात आलेला एक कायदा आहे. सर्कुलेशन कलेक्शन कॉइन डिझाईन अॅक्ट ऑफ 2026 (CCRA) असं या कायद्याला म्हटलं जातं. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या कायद्यावर सही केली होती. या कायद्यानुसार, अमेरिकन ट्रेजरीला अमेरिकेच्या 250 व्या वर्धापन दिनी विशेष डिझाइन असलेला 1 च्या डॉलरचं नाणं बनवण्याची परवानगी देण्यात आली होती.

विशेष म्हणजे या कायद्यातही, नाण्याच्या मागच्या बाजूला कोणत्याही व्यक्तीचे, मग तो जिवंत असो वा मृत, त्याचा फोटो नसेल, असं म्हटलं आहे. पण ट्रम्प यांचा फोटो नाण्याच्या मागच्या बाजूला नाहीये. तर नाण्याच्या प्रथमदर्शनी भागावर आहे. त्यामुळे हे नाणं कायद्याच्या कचाट्यात येत असल्याचं दिसत असलं तरी उपलब्ध कायद्यानुसार 1 च्या डॉलरचं हे नाणं बेकायदेशीर मानलं जाणार नाहीये.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kareena Kapoor Khan : आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणार करीनाचा लेक? मोठा होऊन तैमूर..
  • 5000 ची बचत तुम्हाला करेल लखपती, एसआयपी बेस्ट की आरडी ?
  • Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
  • मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या… पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!
  • लग्नाच्या पंगतीसाठी परवानगी लागणार? केटरर्सला अगोदरच द्यावी लागणार माहिती… तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in