• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हृता दुर्गुळेचा नवीन लुक चर्चेत, दोन वेण्या अन् मोठे कान, लवकरच या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

August 31, 2026 by admin Leave a Comment


मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकांसोबतच तिने चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे. ‘अनन्या’, ‘कन्नी’, ‘कमांडर करण सक्सेना’ आणि ‘आरपार’मधील तिच्या भूमिकांचेही चाहत्यांकडून प्रचंड कौतुक झालं आहे.

सध्या हृता ‘अगं आई अहो आई’ या झी 5 मराठीवरील वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता हृताने तिच्या आगामी सिनेमाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

हृताचा हटके लूक चर्चेत

हृताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती अभिनेता सारंग साठ्ये यांच्यासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, हृताचा लूक पाहून चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

पोस्टरमध्ये हृता शाळेच्या गणवेशात दिसत असून तिच्या गळ्यात टाय, दोन वेण्या आणि चेहऱ्यावर निरागस हास्य दिसत आहे. तर सारंग साठ्ये यांच्या कानावर जास्वंदीचं फूल दिसत असून ते हृताचे कान धरताना दिसत आहेत. पोस्टरचा हा मजेशीर आणि हटके अंदाज पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

पोस्टर शेअर करताना हृताने बाप्पाचा उल्लेख करत लिहिलं की, लहान असो वा मोठा, प्रत्येकजण गणपती बाप्पाकडे काही ना काही मागत असतो आणि तोही मोठ्या मनाने आपली मदत करत असतो. पुढे तिने हा चित्रपट आपलीशी वाटणारी, हलकी-फुलकी आणि निरागस गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

‘आली मोठी शहाणी’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 पासून सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केलं आहे. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्यासोबत या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ऋजुता देशमुख, मैत्रयी दाते, सुहिता थत्ते, गुरू ठाकूर, विशाखा नाईक आणि प्रशांत कुलकर्णी यांचाही चित्रपटात सहभाग आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘टॉक्सिक’मधील ही अभिनेत्री कोण? छोटी भूमिका साकारून एका रात्रीत झाली स्टार, होतंय प्रचंड कौतुक
  • Devendra Fadnavis : 2030 पर्यंत 50 टक्के पेट्रोल-डिझेलची आपली गरज.. पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
  • पदर खोचला, चपला भिरकावल्या… साडी सांभाळत जीवाच्या आकांताने धाव धाव धावली; आईने लेकीसाठी…
  • ENG vs PAK: इंग्लंडविरुद्ध इमाम उल हकने बनाव रचला! पीसीबीने खोटी कहाणी पकडली? आता पाकिस्तानात पाठवणार
  • पाणीपुरी खायला नाही दिली तर खायला मागणारी गाय..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in