
पाणीपुरी जवळपास सर्व महिलांचा विक पॉईंट आहे. पाणीपुरीचे नुसते नाव जरी काढले तरीही तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरीचा गाडा असो किंवा मोठे दुकान सर्वच ठिकाणी महिलांची मोठी गर्दी असते. वेळ, दिवस आणि हंगाम कोणताही असो पाणीपुरी सर्वांनाच प्रचंड खाण्यास आवडते. पाणीपुरी खाल्ली की, तोंडाला एक वेगळीच चव येते. लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते. प्रत्येक घरातील आवडता पदार्थ कोणता असेल तर तो पाणीपुरी आहे. त्यातच गाड्यावर जाऊन पाणीपुरी खाण्याची मजाच वेगळी. पाणीपुरी फक्त महिला आणि मुलींनाच आवडते असे अजिबात नाही, चक्क गायीला देखील पाणीपुरी आवडते, हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून दिसतंय. ज्याचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक आकर्षणाने हा व्हिडीओ बघत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यात चक्क एक गाय पाणीपुरी खात आहे. माणसांसारखी ही गाय पाणीपुरी खात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पाणीपुरी विक्रेता दिसत आहे. हा पाणीपुरी विक्रेता आपल्या गाड्यावर काम करतोय. यादरम्यान मागून एक गाय येते आणि आपल्या शिंगाने त्याला मारताना दिसत आहे.
तो पाणीपुरीवाला गायीकडे थोडे दुर्लक्ष करतो. ती गाय शिंगाने त्याला खुणवताना दिसतंय. त्यानंतर तो पाणीपुरी विक्रेता एक एक करून गायीला पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे. आपल्या हाताने तो पाणीपुरी विक्रेता गायीला पाणीपुरी खाऊ घालत आहे. गायही अजिबात खाली न पडू देता पाणीपुरी खात आहे. एक प्लेट पाणीपुरी गायीला खाऊ घातल्यानंतर तो शेवटी गायीला मसाला पुरीही देताना दिसतोय.
पानी पूरी तो लगभग सभी माताएं और बहनों को पसंद ही है फिर हमारी गौ माता कैसे पीछे रहती ….!! pic.twitter.com/TFJB4DfvQt
— pallavi (@pallvika_) August 31, 2026
कोणीही पाणीपुरी खायला गेल्यानंतर शेवटी मसाला पुरी मागतो. शेवटी मसाला पुरीही या पाणीपुरी विक्रेत्याने गायीला खाऊ घातली. गाय देखील शांतपणे पाणीपुरी खाताना दिसतंय. त्यानंतर तो गायीची माया करताना दिसतोय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
Leave a Reply