• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग

August 31, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून अनेक जण आपलं नियोजन आणि कामाचा आराखडा आखत असतात. त्यामुळे आपल्या राशीत कोणते ग्रह आहेत? त्याच्या आपल्या राशीवर काय प्रभाव पडणार? याची उत्सुकता लागून असते. या महिन्यात चार ग्रह राशी बदल करणार आहेत. शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ ग्रह गोचर करणार आहे. 2 सप्टेंबर रोजी शुक्र स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे ‘मालव्य राजयोग’ आणि ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार होईल. 7 सप्टेंबर रोजी बुध स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे ‘भद्र राजयोग’ तयार होतील. तर 26 सप्टेंबरला बुध तूळ राशीत जाईल. 17 सप्टेंबरला सूर्य सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश करेल, बुध उपस्थित असल्याने 26 सप्टेंबर पर्यंत ‘बुधादित्य राजयोग’ तयार होईल. 18 सप्टेंबरला मंगळ आपल्या नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करेल. तर संपूर्ण महिनाभर शनि मीन राशीत वक्री राहील, राहू कुंभेत आणि केतू सिंह राशीत कायम राहतील.

या राशींना मिळणार लाभ

  • मेष : सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती मेष राशीसाठी अनुकूल असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे उत्तम योग आहेत. नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. व्यावसायिकांना मोठी डील मिळाल्यामुळे आर्थिक फायदा होईल आणि कष्टाचे पूर्ण फळ मिळेल.
  • कन्या: या राशीत सूर्य आणि बुधाची युती झाल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. अचानक धनलाभ मिळण्याचा योग आहे. मालमत्ता किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.
  • तूळ: या राशीचा स्वामी असलेला शुक्र ग्रह स्वराशीत येणार आहे. त्यामुळे शुक्र आणि बुधाच्या गोचरामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत उच्च पद आणि समाजात मान-सन्मान मिळेल. शुक्र राशीत येत असल्याने प्रेम प्रकरणात यश मिळू शकते.
  • मकर: सप्टेंबर महिना मकर राशीसाठी चांगला जाईल अशी ग्रहस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येईल. वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

या राशींना संमिश्र फळ मिळेल

  • कर्क: या राशीच्या जातकांना ग्रहमान तितकं अनुकूल नसलं तर काही अंशी चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. ग्रहाची स्थिती पाहत जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील.
  • वृषभ: कौटुंबिक स्थिती या कालावधीत थोडी चिंताजनक असेल. पण आर्थिक स्थिती चांगली राहील आणि भौतिक सुख-सुविधा वाढतील. दुसरीकडे, प्रेमसंबंधांत थोडे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा.
  • सिंह: शनीच्या अडीकचा प्रभाव या राशीवर आहे. पण त्याचा प्रभाव शनी वक्री झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे मानसिक त्रासातून सुटका होईल. सरकारी क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ मिळेल.
  • वृश्चिक: हा महिना या राशीसाठी थोडा खर्चिक असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला वारेमाप खर्च होण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरीत बदलाचे किंवा प्रमोशनचे संकेत आहेत. पण नोकरी बदलताना काळजी घ्या.
  • धनु : या राशीच्या जातकांना कौटुंबिक पातळीवर काही अंशी दिलासा मिळेल. घरच्यांची साथ मिळेल. पण आर्थिक गणित तुटल्याने थोडी चिडचिड होईल. त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवा.
  • मीन: साडेसातीचा टप्पा सुरू असल्याने सर्व काही संथगतीने सुरू असल्याचा भास होईल. जुनी अडकलेली काम आणि पसारा पाहून वैताग येईल. पण जुने पेमेंट मिळाल्यामुळे आर्थिक चिंता मिटेल. विरोधकांवर विजय मिळवाल आणि परदेशी कामांतून यश येईल.

या राशींनी जरा काळजी घ्यावी

  • मिथुन: या राशीसाठी ग्रहमान अनुकूल नाही. त्यामुळे जातकांनी काळजी घेणं गरजेच आहे. या महिन्यात धावपळ आणि अनावश्यक खर्च वाढेल. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. कामाचा दबाव आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्या.
  • कुंभ: आपण काय बोलतो आणि काय करतो याचा तालमेल असणं आवश्यक आहे. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. त्याचा मोठा फटका बसू शकतो.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय
  • बड्या नेत्याचं नाव… Instagram वर इशारा; हातावर नोट लिहून डॉक्टराने संपवलं जीवन
  • CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या
  • व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
  • Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in