• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुके मासे खायला आवडतात, पण सावधगिरी बागळणं का गरजेचं? माहितीयेत ‘हे’ रहस्य

June 18, 2026 by admin Leave a Comment


सुके मासे आरोग्यासाठी लाभदायक आहेत, त्यामधून पोषक तत्वे मिळत असले तरी, खाताना सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे… सुक्या माशांमध्ये सोडियम, जाड मीठ आणि बुरशीजन्य विषारी घटक देखील असतात. त्यामुळे मासे घेताना योग्या सुक्या माशांची निवड करता आली पाहिजे… जे फार गरजेचं आहे. पण सुक्या माशांचे आरोग्यासाठी लाभदायक फायदे देखील आहेत. तज्ज्ञ देखील सांगतात की, ज्यांना आरोग्याच्या काही समस्या असतील, तर सुक्या माशांपासून दूर राहाणं योग्य आहे. तर जाणून घ्या सुके मासे कोणी खाल्ले पाहिजे आणि कोणी नाही… पण आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…

सुके मासे कोण खाऊ शकतात?

निरोगी व्यक्ती माफक प्रमाणात सुके मासे खाऊ शकतात. त्यांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

स्तनपान करणाऱ्या माता: सुक्या माशांचे माफक प्रमाणात सेवन केल्याने दुधाचे उत्पादन वाढू शकते.

ज्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे: यामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि सर्दी-खोकल्यापासून आराम देतात.

मात्र, त्यांनी फक्त स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचे सुके मासेच निवडावेत. जास्त मीठ न लावता, व्यवस्थित सुकवलेले मासे निवडणे उत्तम.

सुके मासे कोणी खाऊ नयेत?

हृदयरोग आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी: सुक्या माशांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढून हृदयरोग होण्याचा धोका वाढू शकतो.

मधुमेही व्यक्ती: सुक्या माशांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, मधुमेहींनी ते टाळणे उत्तम आहे.

गर्भवती महिला – लहान मुले: सुक्या माशांमध्ये जड धातू असू शकतात. याचा गर्भवती महिला, गर्भातील बाळ आणि लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या असलेल्या व्यक्ती: जड धातू आणि अतिरिक्त सोडियम मूत्रपिंड आणि यकृतावर अतिरिक्त भार टाकू शकतात, ज्यामुळे आधीपासून असलेल्या समस्या अधिक गंभीर होतात.

पुरळ आणि त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांसाठी: सुक्या माशांमुळे ॲलर्जी, पुरळ आणि खाज येऊ शकते. त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः धोकादायक आहे.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in