• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा अखेर राजीनामा, कर्नाटकात आता डी के शिवकुमार पर्व!

May 28, 2026 by admin Leave a Comment


Karnataka CM Siddaramaiah Give Resignation : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या. सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तेचे खांदेपालट होणार असे सांगितले जात होते. त्या दिशेने काँग्रेसने पाऊलही टाकले होते. असे असतानाच आता कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. आता सिद्धरामय्या यांची जागा काँग्रेसचेच नेते डी के शिवकुमार हे घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 30 मे रोजी डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी मी हा राजीनामा देत आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.

अडीच-अडीच वर्षांचा होता फॉर्म्यूला

सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तीन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी डी के शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये होते. तेच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. परंतु सिद्धरामय्या यांचा राजकीय अनुभव मोठा असल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. परंतु सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरलेला होता. अगोदरच्या अडीच वर्षात सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असतील आणि नंतरच्या अडीच वर्षात डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री असतील, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसारच आता सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे.

पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे केले जाहीर

या ठरलेल्या सूत्रानुसार दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कर्नाटकमधील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, असे सांगण्यात आले होते. दिल्लीमध्ये साधारण सहा तास ही बैठक चालली होती. आज (28 मे) सिद्धरामय्या यांनी आपल्या कर्नाटकातील निवासस्थानी ब्रेकफास्ट बैठक घेतली आणि आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

आता डी के शिवकुमार पर्व सुरू

आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री हे डी के शिवकुमार असणार आहेत. त्यांची लवकरच विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड होईल. आणि ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे आता तेथे डी के शिवकुमार पर्व सुरू होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in