• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्व ठिकाणी आंदोलन सुरु, काहीतरी चुकतंय.. सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान..

September 6, 2026 by admin Leave a Comment


खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी डीजेच्या मुद्द्यावर भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, वाद खुपच टोकाला गेला आहे. सरकारला विनंती आहे, सर्वांना एकत्र बोलवुन मार्ग काढणे गरजेच आहे. शिक्षणाच्या माहेरघरात खाकिची भीती राहिली नाही. अजून आपले मुख्य सण येणे बाकी आहेत. यादरम्यान त्यांनी नागपूरचे उदाहरण देखील दिले. भंडारे प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, किती दुर्दैवी आहे. फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपला. काय चालले आहे राज्यात. सरकारने लक्ष घातले पाहिजे. काकडेंवर बोलताना सुळे यांनी म्हटले की, नाचण्याचा विरोध नाही. सुप्रिम कोर्ट काय सांगते, नियम कायद्यात. नागपुरात कायदा चालु शकतो तर राज्यात का नाही?

सण साजरे करणे आपली संस्कृती आहे. हात उगारने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. शिक्षण विभागाच्या कारभारावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, राज्य आणि देशातली स्थिती खूप चिंताजनक आहे. काळानुसार सर्वांना बदलावे लागते. मुलांनी कोणत्या परिक्षेचा अभ्यास करायचा? मुल खूप जास्त यात भरडली जात आहेत.

नीटही द्यायची 12 वीची परीक्षाही द्यायची. सर्वच मुले याच भरडली जात आहेत. ते सत्तेत आहे का नाही, त्यांच्या नेत्यांना सांगा तुमच्या मंत्री आणि आमदारांना त्यांना आवरा. गुलाबराव पाटील यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी बोलणे बंद केले आहे.

मुंबई दहिहांडी मृत्यु प्रकरणावर बोलताना सुळे यांनी म्हटले की, सुरक्षा हा घटक खुप महत्वाचे आहे. आपली आई, बायको आणी बहीन आपली वाट पाहात आहेत. सुरक्षेला प्राधान्य असले पाहिजे. जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, चिंताजनक आहे. सर्व ठिकाणी आंदोलन सुरु आहे. 200 आमदारांचे सरकार आहे.
काहीतरी चुकतंय. सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंना टिळा आवश्यक, विश्व हिंदू परिषदेची नियमावली..
  • भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला…
  • Prajakta Mali: घरच्यांना समजावणं अवघड.., लग्नाच्या दबावावर अखेर प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली
  • Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचललं मोठं पाऊल, पुन्हा मॅच फिक्सिंगची चर्चा, खेळाडूंकडून काढून घेतले…
  • Sanjay Raut: तुम्ही पिशवी घेऊन या, आपण बाजारात जाऊ, महागाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना घेरलं, म्हणाले काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in