• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून; लग्नावर मामाचा शिक्कामोर्तब

June 29, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हा आयपीएलमधील ‘सनराइजर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारनशी लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. या चर्चांवर आता अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी अनिरुद्ध आणि काव्या यांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध हा काव्या मारनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या लग्नाच्याही चर्चांना उधाण आलं होतं. आता वाय. जी. महेंद्रन यांनी या चर्चांना पूर्णविराम देत दोघांच्या लग्नाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

केपी टीव्हीवरील ‘कुट्टी पद्मिनी’ला दिलेल्या मुलाखतीत महेंद्रन म्हणाले, “अनिरुद्ध हा खूप शांत आणि साधेपणाने वागणारा मुलगा आहे. मी या निमित्ताने त्याचं अभिनंदन करू इच्छितो. त्याचं लग्न खूप थाटामाटात होणार आहे. मला जे सांगण्यात आलं आहे, त्यानुसार हे निश्चित झालं आहे. त्यांचं लग्न होणार आहे.” काव्या ही सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी आहे. अनिरुद्ध आणि काव्या 2025 मध्ये लास वेगासमध्येही एकत्र दिसले होते. इतकंच नव्हे रजनीकांत यांनी कलानिधी मारन यांच्यासोबत काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाविषयीही चर्चा केली होती, असं म्हटलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anirudh (@anirudhofficial)

अनिरुद्धने याआधी काव्यासोबतच्या नातेसंबंधाच्या चर्चांना नाकारल्या असल्या तरी आता त्याच्या मामाने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. काव्या 33 वर्षांची असून अनिरुद्धपेक्षा ती दोन वर्षांनी लहान आहे. अनिरुद्ध हा 35 वर्षांचा आहे. अनिरुद्ध हा दाक्षिणात्य सुपरस्टार रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. त्याची आई लक्ष्मी या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्याने रजनीकांत यांच्यापासून ते कमल हासन, ज्युनियर एनटीआर, थलपती विजय आणि अगदी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटापर्यंत अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिलं आहे. तो रजनीकांत यांचा नातेवाईक आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत.

अनिरुद्ध आणि काव्य येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात लग्न करू शकतात. मात्र या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघं डेस्टिनेशन वेडिंग करतील. त्यानंतर चेन्नईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात येईल.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in