• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित शर्माचं पुढे काय? बीसीसीआयने काय घेतला निर्णय? बैठकीत असं काही घडलं

September 3, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. त्याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्याचं आहे. पण त्याच्याबाबत बीसीसीआय आणि निवड समितीत मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत फिट बसत नाही, असं निवड समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह होतं. कारण इंग्लंड दौऱ्यातील वनडे मालिका त्याच्या कारकि‍र्दीची शेवटची मालिका असल्याचं बोललं गेलं. पण शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं आणि सर्वांची बोलती बंद केली. पण त्यानंतरही त्याच्या भवितव्याच्या वावड्या उठल्या. त्यामुळे मुंबईत 3 सप्टेंबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीकडे लक्ष लागून होतं. रोहित शर्माचं काय होणार? याचा फैसला या बैठकीत होणार होता, अशी चर्चा होता. आता बीसीसीआयच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे.

रोहित शर्माबद्दल बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार, तो सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळत आहे. तुम्हाला आणखी काय हवे आहे? मागच्या सामन्यात त्याने 130-140 धावा केल्या. मग त्याच्याबद्दल असं का बोललं जात आहे? मला अंदाज बांधणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत द्यायचे नाही.

BCCI SECRATARY ON ROHIT SHARMA:

“He is playing superbly in all matches. What more do you want? In the last match, he scored 130-140 runs. So why is there speculation? I do not want to give fodder to the speculators”. [Subhayan Chakraborty] pic.twitter.com/lIwhch7AFq

— Johns. (@CricCrazyJohns) September 3, 2026

बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्मा आणि अजित आगरकरच्या भविष्याचा निर्णय होणार होता. बीसीसीआयच्या बैठकीत बोर्ड पदाधिकाऱ्यांसह हेड कोच गौतम गंभीर, वनडे कसोटी कर्णधार शुबमन गिल, टी20 संघाचा श्रेयस अय्यर, सेंटर ऑफ एस्किलेंसचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवड समिती सदस्य होते. पण निवड समिती अध्यक्ष काही वैयक्तिक कारणामुळे हजर नव्हते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kareena Kapoor Khan : आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणार करीनाचा लेक? मोठा होऊन तैमूर..
  • 5000 ची बचत तुम्हाला करेल लखपती, एसआयपी बेस्ट की आरडी ?
  • Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
  • मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या… पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!
  • लग्नाच्या पंगतीसाठी परवानगी लागणार? केटरर्सला अगोदरच द्यावी लागणार माहिती… तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in