• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रीय पुरस्कार विजेतीसारखा अभिनय..; रिंकू राजगुरूच्या वारीच्या गाण्यावर कमेंट्सचा वर्षाव

July 14, 2026 by admin Leave a Comment

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूचा पहिलावहिला अल्बम साँग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बाप विठुराया' असं या गाण्याचं नाव असून वारीच्या पार्श्वभूमीवर ते अधिक खास ठरतंय.

रिंकू राजगुरू तिचे प्रोजेक्ट्स फार विचारपूर्वक निवडताना दिसते. तिच्या कामाची पद्धत इतर कलाकारांपेक्षा थोडी वेगळी असल्याने प्रचंड लोकप्रिय होऊनही तिने आजवर कुठलाच अल्बम साँग केला नव्हता. आता पहिल्यांदाच तिने अल्बम साँग करण्याचा निर्णय घेतला असून त्यामागचं कारणही खास आहे.

अजय गोगावले यांच्या आवाजातील 'बाप विठुराया' हे गाणं नेटकऱ्यांना खूप आवडलं आहे. रिंकूने सोशल मीडियावर गाणं पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे. या गाण्यात रिंकूने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे.

रिंकूने खरंच या गाण्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीसारखा अभिनय केला आहे अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. नागराज मंजुळेंमुळे मराठी चित्रपटसृष्टीला उत्तम अभिनेत्री मिळाली असंही कौतुक काहीजण करत आहेत.

रिंकूने खरंच या गाण्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीसारखा अभिनय केला आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. नागराज मंजुळेंमुळे मराठी चित्रपटसृष्टीला उत्तम अभिनेत्री मिळाली, असंही कौतुक काहीजण करत आहेत.

माझं विठ्ठलाशी नातं खूप खास आहे. त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत ते माझ्यासोबत असतात. त्यामुळे माझं पहिलं अल्बम विठ्ठलावर चित्रीत झाल्याचा मला खूप आनंद आहे अशी प्रतिक्रिया रिंकू राजगुरूने दिली आहे.

माझं विठ्ठलाशी नातं खूप खास आहे. त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत ते माझ्यासोबत असतात. त्यामुळे माझं पहिलं अल्बम विठ्ठलावर चित्रीत झाल्याचा मला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया रिंकू राजगुरूने दिली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in