• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राबडी देवी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे नोटिस, बिहारमध्ये राजकारण तापले

May 30, 2026 by admin Leave a Comment


बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल ( आरजेडी ) च्या नेत्या राबडी देवी यांना पाटणा येथील १० सर्क्युलर रोडवरील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. प्रशासनाने राबडी देवी यांना नोटीस पाठवून हे सरकारी घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. हे निवासस्थान आता पशु आणि मत्स्य उद्योग मंत्री नंद किशोर राम यांना देण्यात आले आहे. बिहार सरकारच्या या पावलाने आता राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

हा सरकारी बंगला बिहारच्या राजकारणाचा गेली दोन दशकांचा साक्षीदार आता या नोटिसीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. राजधानी पाटणाच्या व्हीआयपी भागातील १० सर्क्युलर रोड येथील हा बंगला अनेक दशकांपासून राबडी देवी यांचे सरकारी निवासस्थान होता. याआधी नोव्हेंबर २०२५ मध्ये देखील राबडी देवी यांना या निवासस्थानाला रिकामे करण्याची नोटिस देण्यात आली होती. आता नव्याने नोटिस जारी केल्याने हे प्रकरण पुन्हा राजकीय चर्चेचा विषय बनले आहे.

पार्टीच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र

मुख्यमंत्री निवास स्थान आणि राजभवनाच्या जवळ असलेला हा बंगला केवळ आरजेडीच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्रच नव्हे तर पक्षाच्या अनेक महत्वाचे निर्णय आणि धोरणात्मक बैठकीचे केंद्र ठरला होता. हे केवळ निवासस्थान नव्हते तर लालू प्रसाद यांच्या राजद पार्टीसाठी खास ठिकाण होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या निवासस्थानाविषयी आगळे आकर्षण आणि स्थान होते. आणि राजदचे ती एक ओळख बनले होते.

राबडी देवी यांचा नवा पत्ता

या संदर्भात अधिकाऱ्यांनी आता राबडी देवी यांना बिहार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना मंजूर झालेल्या ३९ हार्डिंग रोड येथील सरकारी निवासस्थानात स्थलांतरीत होण्यास सांगितले आहे. सरकारचे म्हणणे आहे की निवास मंजूरीच्या नियमांनुसार ही प्रक्रिया केली जात असून सर्व लोकप्रतिनिधींना निर्धारित नियमांचे पालन करावेच लागेल.

बिहार विधानसभेचे अध्यक्ष काय म्हणाले ?

आरजेडी नेते राबडी देवी यांना बिहार सरकारने पाठवलेल्या नोटिसीवर बिहार विधानसभेचे अध्यक्ष प्रेमकुमार यांनी सांगितले की सरकारने नियम बनवलेले असून त्यांचे पालन खास करुन लोकप्रतिनिधींनी तर करायला हवे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची नोटिस दिली होती. त्यावर आरजेडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

येथे पोस्ट पाहा –

Bihar | Notice issued to vacate the government residence allotted to RJD leader Rabri Devi

The official residence at 10 Circular Road has now been allotted to Nand Kishore Ram, the Bihar government’s Minister for Animal, Fisheries, and Dairy Resources. pic.twitter.com/wphRxNqhNI

— ANI (@ANI) May 29, 2026

आरजेडीच्या प्रवक्त्यांचा आरोप

आरजेडीने सरकारच्या या निर्णयाला राजकीय हेतून प्रेरित म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते शक्ती यादव यांनी म्हटले की बांधकाम मंत्री एक समजदार व्यक्ती आहेत. परंतू हा निर्णय दर्शवतो की १ अणे मार्गावर (1 Ane Marg)भाजपाचा प्रभाव किती वाढला आहे. त्यांचा इशारा जेडीयूचे नेते विजय कुमार सिन्हा यांच्याकडे होता.

आधीच्या नोटिसीवर मुलीची प्रतिक्रीया

राबडी देवी यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी आधीही या प्रकारच्या नोटीसीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले होते की सर्वात मोठी प्राथमिकता कोट्यवधी लोकांचे नेते लालू प्रसाद यांना अपमानित करण्याची आहे. तुम्ही त्यांना घरातून तर काढू शकता, परंतू जनतेच्या हृदयातून कसे काढणार ? त्यांची प्रकृती नव्हे तर त्यांच्या राजकीय स्थानाचा तरी विचार करायला हवा होता असे त्यांनी म्हटले आहे.

 

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केस केराटिनसारखे होतील मऊ, फक्त ‘हे’ 4 नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर
  • Vijay -Trisha : ना बर्थडे विश, ना काही पोस्ट.. थलपती विजय यांना त्रिशाने केलं अनफॉलो ? त्या कृतीमुळे खळबळ
  • Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?
  • मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
  • केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in