• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!

August 28, 2026 by admin Leave a Comment


भूषण पाटील : कर्नाटकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विजयपुरा शहराशेजारील भूतनाथ तलावात एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचे मृतदेह आढळल्याचे उघडकीस आले. यात एक महिला आणि तिच्या पाच मुलांचा समावेश आहे. हे सर्व गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विजयपुर शहराशेजारील ऐतिहासिक भूतनाथ तलावात महिलेने आपल्या तीन मुलींसह दोन मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पतीशी झालेल्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. विजयपूर तालुक्यातील तोरवी गावातील शोभा जालगिरे या आपल्या मुलांसह 24 ऑगस्ट पासून बेपत्ता होत्या. काल सकाळी विजयपूरमधील भूतनाथ तलावात काही मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिकांना निदर्शनाला आलं. सुरुवातीला तलावात पोहोण्यासाठी गेले असता मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता. मात्र तपासादरम्यान शोभा यांनी पतीशी झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या तीन मुलींसह दोन मुलांना घेऊन ही आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसांना होता घातपाताचा संशय

कुटुंबातील सहा जणांच्या मृत्यूने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सर्व जण फिरण्यासाठी तलावाजवळ गेल्यानंतर कुणीतरी पाय घसरून तलावात पडले असावे. त्यानंतर एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना कुटुंबातील सहा जण बुडाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांना घातपाताचाही संशय होता. परंतु तपासानंतर कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले होते घटनास्थळी

पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी पोहोचल्यानंतर सांगितले होते की, तलावात मृतदेह सापडल्यानंतर तातडीने आमच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामा केला. त्यानंतर तलावातील सर्व मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सर्व कुटुंबीय तलावात कसे पोहोचले, याचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचा तपास करण्यात येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..
  • Nitin Gadkari: मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी खंत, जातीय सेलवरही निशाणा
  • Nepal Flood: तिबेटमध्ये अडकले महाराष्ट्रातील 37 भाविक; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी मदत
  • आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच…
  • MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in