• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा

August 28, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण परीक्षा पेपर फुटीप्रकरणात एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या लव्ह अँड हेट स्टोरीपूरतंच हे प्रकरण मर्यादित नाही. याप्रकरणातील अर्थपूर्ण व्यवहार आता तपासाच्या रडारवर आला आहे. ऋतुजा पाटील हिचे नवे व्हॉट्सअप संभाषण समोर आले आहे. त्यात आर्थिक व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपरफुटीसाठी मोठी डील झाल्याचा आकडा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा दुसरा अँगल समोर आला आहे.

5 नाही 50 लाखांची डील

एमपीएससी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप संभाषण समोर आले आहे. मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आधी मिळवण्यासाठी 50 लाख भरले असे ऋतुजा मैत्रिणीला सांगताना यात पाहायला मिळतेय. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 5 लाखात पेपर फुटला अशी माहिती समोर येत होती, मात्र ऋतुजाच्या चॅटमध्ये 50 लाखांचा दावा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एमपीएससीमधील तीन अधिकारी सध्या गुन्हे शाखेच्या अटकेत आहे. मात्र 50 लाखांच्या ऋतुजाच्या दाव्याने भुवया उंचावल्या आहेत. पेपर फक्त 5 लाखात फुटला की त्याची आणखी मोठी किंमत ऋतुजाच्या वडिलांनी दिली होती याचाही तपास सुरू आहे.

12 लाखांच्या व्यवहाराचा तपास

याप्रकरणात पैशांचा व्यवहाराही तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रवीण पाटीलकडून पैशांची मागणी होत असल्याने अमृत पाटील चिंतेत असल्याचे ऋतुजाने मैत्रिणीला सांगितल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत अमृत यांनी प्रवीणला 12 लाख रुपये दिल्याची माहिती मिळाली आहे. अमृत पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यातील संपर्काचा दुवा म्हणून मयूर ठाकरे हे एक नाव समोर येत आहे. ऋतुजाच्या संभाषणातून मिळालेल्या या धाग्याच्या आधारे पोलीस आता ठाकरेसह अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

ते प्रश्न कुणाला पुरवले?

अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील 294 प्रश्नांपैकी प्रत्यक्षात किती प्रश्न कुणाकुणाला पुरवण्यात आले, याचा शोध सुरू आहे. यासाठी आरोपींच्या मोबाईलमधील संभाषण, संदेश आणि इतर माहिती तापसली जाणार आहे. प्रवीणसह दोघांनीही परीक्षा काळानंतर नवीन मोबाईल घेतल्याचे समोर आले आहे. ऋतुजा पाटील हिला जे प्रश्न पुरवण्यात आले. त्यातील 78 प्रश्न परीक्षेत आल्याचे तपासात उघड झाले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 22 हजार कोटींची कर्जमाफी कशी? HDFC-LIC आक्रमक; थेट NCLATमध्ये धाव?
  • Vaibhav Sooryavanshi: बीसीसीआयच्या एका अटीमुळे इतकं छान खेळूनही वैभवला संघात स्थान नाही, असं का?
  • हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
  • Manoj Jarange : अंतरवालीत मोठं काही तरी घडणार? उपोषणाआधीच मनोज जरांगेंचा मराठ्यांना महत्त्वाचा संदेश
  • मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in