• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

22 हजार कोटींची कर्जमाफी कशी? HDFC-LIC आक्रमक; थेट NCLATमध्ये धाव?

August 28, 2026 by admin Leave a Comment


सुभाष चंद्रा यांच्याशी संबंधित 22 हजार कोटीच्या कर्जमाफीचं प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. NCLATने कर्जमाफीची तडजोड करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुभाष चंद्रा यांना आता 22,006 कोटी ऐवजी केवळ 6.25 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे बाकीचं कर्ज माफ झालं आहे. यामुळे ज्या बँकांतून कर्ज घेण्यात आलं, त्या बँकांचं मोठं नुकसान होणार आहे. या अजब निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या विरोधात एचडीएफसी आणि एलआयसी हौसिंग फायनान्सने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता या दोन्ही वित्तीय संस्थांनी नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल (NCLAT) मध्ये जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे एनसीएलएटी यावर काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एनसीएलटीने एस्सेल ग्रुपच्या कंपन्यांनी घेतलेल्या 22,006 कोटीच्या कर्जाच्या निपटाऱ्याला हिरवा कंदील दाखवला आहे. या मोठ्या रकमेची झीचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी गॅरंटर म्हणून जबाबदारी घेतली होती. मंजूर करण्यात आलेल्या प्लाननुसार, मुख्य कर्जदारांकडून 1,494 कोटी रुपयांची वसुली आता केली जाऊ शकते. तसेच खासगी गॅरंटर म्हणून सुभाष चंद्रा यांना केवळ 6.25 कोटी रुपये भरायचे आहेत. यावरच काही बँकांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, कमिटी ऑफ क्रेडिटर्समध्ये सामिल 80.8 टक्के कर्जदारांनी वोटिंगद्वारे सेटलमेंटचं पूर्ण समर्थन केलं होतं.

एनएचबीला हस्तक्षेप करण्याचं आवाहन

इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, या सर्व प्रकरणावर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी असहमती दर्शवली आहे. यात LICHFL, HDFC बँक, अॅक्सिस बँक, कॅनरा बँक, आरबीएल बँक आणि यूनियन बँकांचा मुख्यत्वे समावेश आहे. HDFC बँकेने यावर प्रतिक्रिया देताना आम्ही प्रस्तावाच्या विरोधात मतदान केल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच एचडीएफसीकडून आता NCLATमध्ये अपील दाखल करण्याच्या पर्यायांवर विचार सुरू आहे. तर, दुसरीकडे LICHFL नेही NCLATमध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतातील हौसिंग सेक्टरची सर्वोच्च संस्था नॅशनल हौसिंग बँक (NHB)लाही यात हस्तक्षेप करण्याची मागणी LICHFL ने केली आहे. LICHFL याच्या तर्कानुसार 22,006 कोटी रक्कम क्लेम करण्याऐवजी कर्जदारांकडून केवळ 6.25 कोटी वसूल करून घेणं योग्य नाहीये. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात NCLAT काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Deool Band 2: शाहरुख खानची 42 लाखांची मदत, आता ‘देऊळ बंद 2’चा नफा कुठे जाणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय
  • Earthquake Alert: मोठी बातमी! नेपाळनंतर आता भारत हादरलं, भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
  • उरलीसुरली माणुसकी मेली… नेपाळमध्ये मृतदेहांच्या दागिण्यांची लूट; कोण आहेत दोन गिधाडे?
  • अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
  • अरे काय रे शिंदे गट? सोड रे, अरे चोरच आहेत ना? मुंबईचं महापौरपद किती कोटीला? राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in