• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्री 1 वाजता पोलीस घरात घुसले अन्… सामाजिक कार्यकर्त्याला अटक, कारण…

September 3, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटलांसंदर्भात अक्षेपरह आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संतोष पंडित यांनी दोन दिवसांपूर्वीच पडळकरांच्या गाडीच्या एचएसआरपी नंबर प्लेटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता संतोष पंडित यांच्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईवर पंडित यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मध्यरात्री १ वाजता माझ्या घरामध्ये आत शिरून काचा वाजवण्यात आल्या, दार वाजवण्यात आलं. मी जेव्हा खिडकीतून ओरडलो, तेव्हा स्वतः पोलीस आले. पोलीस स्वतः म्हणत होते की त्यांनीच माझ्या घराचे दार आणि खिडकी वाजवली.” पंडित यांनी पोलिसांच्या या कारवाईला “हरेसमेंट” म्हटले असून, अशा पद्धतीने पोलीस प्रशासन काम करत असेल, तर सामान्य नागरिकांनी जगायचं कसं, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी फडणवीस यांना उद्देशून या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. अटकेदरम्यान, त्यांचा मोबाईल फोन आणि गाडीची चावी पोलिसांना द्यावी लागल्याचेही त्यांनी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kareena Kapoor Khan : आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणार करीनाचा लेक? मोठा होऊन तैमूर..
  • 5000 ची बचत तुम्हाला करेल लखपती, एसआयपी बेस्ट की आरडी ?
  • Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
  • मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या… पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!
  • लग्नाच्या पंगतीसाठी परवानगी लागणार? केटरर्सला अगोदरच द्यावी लागणार माहिती… तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in